नवीन फोन घेण्यापेक्षा चांगल्या कंडिशनमधला जुना फोन घेण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. नवीन स्मार्टफोन्सच्या वाढत्या किमतींमुळे सेकंड हँड मोबाईल मार्केटला चांगलाच बूस्ट मिळालाय. या बिझनेसमध्ये नेमका किती फायदा होतो, ते आपण पाहूया.
नवीन स्मार्टफोन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक जण कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स देणाऱ्या जुन्या मोबाईलला पसंती देतात. सेकंड हँड फोनची डिमांड वाढल्याने खरेदी-विक्रीतून बिझनेसच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या या बिझनेसमध्ये खरंच किती फायदा होतो? कोणत्या फोनला जास्त डिमांड आहे? आणि हा बिझनेस सुरू करताना कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
26
जुन्या फोनची डिमांड का वाढतेय?
सेकंड हँड मोबाईलची डिमांड वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे किंमत. नवीन फोनसाठी २० ते ४० हजार रुपये खर्च करण्याऐवजी, तेच फीचर्स असलेला जुना मॉडेल कमी किमतीत मिळतो. विद्यार्थी, नोकरदार आणि कमी बजेट असलेले लोक या मार्केटमध्ये जास्त रस दाखवतात. एका रिपोर्टनुसार, या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतात रिफर्बिश्ड स्मार्टफोनच्या विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन फोनच्या वाढत्या किमतींमुळे लोक कमी किमतीत प्रीमियम फोन घेण्यास प्राधान्य देत आहेत.
36
कोणत्या फोनला जास्त डिमांड असते?
सेकंड हँड मार्केटमध्ये सर्वच फोनला सारखी डिमांड नसते. ग्राहक कॅमेरा, परफॉर्मन्स, डिझाईन आणि सॉफ्टवेअर अपडेट्स पाहून फोन खरेदी करतात. विशेषतः ॲपल आयफोनचे जुने मॉडेल्स आणि सॅमसंगच्या प्रीमियम सिरीजला मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. हा बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुमच्या भागात कोणत्या ब्रँडचे आणि किती किमतीचे फोन जास्त विकले जातात, याचा अभ्यास तुम्ही करायला हवा.
हा बिझनेस सुरू करण्यासाठी मोठ्या शोरूमची गरज नाही. तुम्ही कमी गुंतवणुकीत घरून किंवा छोट्या दुकानातून सुरुवात करू शकता. जुने फोन विकणाऱ्यांकडून थेट खरेदी करणे, एक्सचेंजमधून आलेले फोन गोळा करणे आणि खात्रीशीर सप्लायर्सशी संपर्क वाढवणे फायद्याचे ठरते. पण विकण्यापूर्वी प्रत्येक फोनची नीट तपासणी करणे गरजेचे आहे. बॅटरी, डिस्प्ले, टच, कॅमेरा, स्पीकर, चार्जिंग पोर्ट आणि वाय-फाय तपासा. फोनचा IMEI नंबर नक्की चेक करा आणि जुना डेटा पूर्णपणे डिलीट करूनच फोन विका.
56
या बिझनेसमध्ये किती नफा मिळतो?
सेकंड हँड फोन बिझनेसमधील नफा हा कमी किमतीत फोन खरेदी करून, त्याची कंडिशन सुधारून योग्य किमतीत विकण्यावर अवलंबून असतो. समजा, तुम्ही एखादा फोन ८,००० रुपयांना विकत घेतला. त्यावर रिपेअरिंग आणि क्लिनिंगसाठी १,००० रुपये खर्च केले, तर एकूण खर्च ९,००० रुपये होतो. तोच फोन तुम्ही १०,००० रुपयांना विकला, तर तुम्हाला १,००० रुपये नफा मिळतो. दुकानासोबतच तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया ग्रुप्सवरही जुने फोन विकू शकता.
66
बिझनेसमध्ये कोणती आव्हाने येतात?
या बिझनेसमध्ये नफा असला तरी रिस्कही कमी नाही. जुना मोबाईल बाहेरून चांगला दिसत असला तरी आतून तांत्रिक बिघाड असू शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी डिस्प्ले, टचस्क्रीन, कॅमेरा, बॅटरी आणि नेटवर्क नीट तपासा. नवीन फोनच्या किमती कमी होणे, जुन्या मॉडेल्सचे सॉफ्टवेअर अपडेट्स बंद होणे आणि मार्केटमधील वाढती स्पर्धा या गोष्टींचा बिझनेसवर परिणाम होतो. त्यामुळे वेगाने विकले जाणारे मॉडेल्स ओळखा आणि खरेदीची किंमत काळजीपूर्वक ठरवा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .