सॅमसंगने टीव्हीएवढ्या स्क्रीनचा लॉंच केला फोन, फोल्ड करून सोबत जा घेऊन

Published : Dec 05, 2025, 03:43 PM IST

सॅमसंग कंपनीने आपला पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो उघडल्यावर १०-इंचाचा डिस्प्ले देतो. यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, २०० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि ५६०० एमएएचची बॅटरी आहे. हा फोन १२ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

PREV
17
सॅमसंगने टीव्हीएवढ्या स्क्रीनचा लॉंच केला फोन, फोल्ड करून सोबत जा घेऊन

सॅमसंग कंपनीने त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन हा मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन उघडल्यानंतर कंपनीकडून १० इंचाचा डिस्प्ले देण्यात येतो. या फोनमध्ये गॅलेक्सीसाठी स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेज आहे.

27
फोनची विक्री कधी होणार सुरु?

या फोनच्या विक्रीला कंपनीने लवकरच सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे. यात 5600 एमएएच बॅटरी असून 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन १२ डिसेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार असून काही दिवसांमध्ये त्याची किंमत सांगितली जाईल.

37
कंपनी कोणत्या रंगात फोनची करणार विक्री?

कंपनी फोनची विक्री विविध रंगात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तो चीन, तैवान, सिंगापूर, युएई आणि अमेरिका यांसारख्या जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाईल असेही कंपनीने सांगितले. या आधी तो दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये आणला जाणार आहे.

47
स्मार्टफोनला देण्यात आली मोठी स्क्रीन

या स्मार्टफोनला कंपनीकडून मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डमध्ये 10-इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED 2X इनर डिस्प्ले आहे. तो 269ppi पिक्सेल डेन्सिटी, 1600 निट्स ब्राइटनेस आणि 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट देतो. त्याचा 6.5-इंचाचा फुल-एचडी+ कव्हर डिस्प्ले 120Hz ला देखील सपोर्ट करतो

57
धूळ आणि पाणी दोघांपासून फोनचं होत रक्षण

धूळ आणि पाणी या दोन्हीपासून फोनचं रक्षण होत असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 ने संरक्षित आहे. तो अँड्रॉइड 16-आधारित OneUI 8 वर चालतो. मागील पॅनल सिरेमिक-ग्लास FRP ने बनलेला आहे आणि डिव्हाइस IP48 रेटेड आहे.

67
मजबूत कॅमेरा आणि बॅटरी

कंपनीने मजबूत कॅमेरा आणि बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा एक प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्यासोबत 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहे, जो 30x डिजिटल झूम देतो. कव्हर आणि आतील डिस्प्ले दोन्हीवर 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

77
कंपनीने दिली ५,६०० एमएएचची बॅटरी

कंपनीने फोनसोबत ५,६०० एमएएचची बॅटरी दिली आहे. 45 वॅट वायर्ड आणि 15 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5600 एमएएच बॅटरी पॉवर प्रदान करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5 जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहेत.

Read more Photos on

Recommended Stories