
Royal Enfield Meteor 350 Sundowner Orange : गोव्यात सुरू असलेल्या मोटोव्हर्स 2025 कार्यक्रमात रॉयल एनफील्डने आपली लोकप्रिय क्रूझर Meteor 350 ची नवीन विशेष आवृत्ती 'सनडाउनर ऑरेंज' लाँच केली आहे. या मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 2.18 लाख रुपये आहे. ही किंमत स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 27,649 रुपयांनी जास्त आहे. बुकिंग 22 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होईल. चला या बाईकची वैशिष्ट्ये सविस्तर पाहूया.
नवीन Meteor 350 सनडाउनर ऑरेंजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची खास पेंट स्कीम आणि टूरिंग-रेडी लूक. स्टँडर्ड मॉडेल फायरबॉल ऑरेंज, फायरबॉल ग्रे, स्टेलर मॅट ग्रे, स्टेलर मरीन ब्लू, अरोरा ग्रीन, अरोरा रेड आणि सुपरनोव्हा ब्लॅक अशा विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असले तरी, ही विशेष आवृत्ती केवळ याच एक्सक्लुझिव्ह रंगात उपलब्ध आहे. यात फॅक्टरी-फिटेड टूरिंग सीट, फ्लायस्क्रीन, पॅसेंजर बॅकरेस्ट आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड यांसारखी वैशिष्ट्ये आधीपासूनच दिलेली आहेत.
बाईकचा प्रीमियम लूक आणखी वाढवण्यासाठी, यात ॲल्युमिनियम ट्यूबलेस स्पोक व्हील्स, स्लिप-अँड-असिस्ट क्लच, ॲडजस्टेबल लिव्हर्स, एलईडी हेडलॅम्प आणि यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ज्या रायडर्सना क्रूझर रायडिंगचा खरा थरार आणि प्रवासाची वैशिष्ट्ये एकत्र अनुभवायची आहेत, त्यांच्यासाठी हे मॉडेल योग्य आहे.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, या विशेष आवृत्तीमध्ये तेच 349cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. चेसिस, सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सेटअपमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..