Jio कडून नवा रिचार्ज प्लॅन लाँच, 75 रुपयांत मिळणार अनलिमिडेट कॉल-डेटा

Published : Aug 20, 2024, 01:41 PM IST
Reliance Jio Recharge Plans

सार

रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांसाठी एक नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. केवळ 75 रुपयांमध्ये युजर्सला अनलिमिडेट कॉल आणि डेटाचा लाभ घेता येणार आहे. जाणून घेऊया अन्य सुविधा युजर्सला कोणत्या मिळणार याबद्दल अधिक...

Reliance Jio New Recharge Plan : रिलायन्स जिओला नुकत्याच नेटवर्क आणि डबल रिचार्जच्या कारणास्तव समस्येचा सामना करावा लागला होता. ग्राहकांकडून मोबाइल क्रमांक पोर्ट करण्याचाही विचार केला जात होता. अशातच जिओकडून एक नवा धमाकेदार प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने केवळ 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी आणला आहे. या रिचार्ज प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. यामध्ये मोफत, कॉलसह अन्य फायदे मिळणार आहेत.

जिओचा नवा रिचार्ज प्लॅन
अत्यंत कमी किंमतीत पुन्हा एकदा जिओने युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन आणला आहे. 75 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 23 दिवस मोफत कॉलिंग आणि नेटवर्कचा फायदा घेता येणार आहे. याशिवाय 100MB डेटा मोफत आणि एकूण 23 दिवसात 2.5GB डेटा फ्री मिळणार आहे.

प्रत्येक दिवशी 100MB डेटा संपल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही. कारण इंटरनेट सेवा बंद होणार नाही. इंटरनेट स्पीड 64kbps होणार आहे. याशिवाय 50 SMS ची सुविधा मोफत मिळणार आहे. अशाप्रकारचा एकूणच प्लॅन जिओकडून युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे.

जिओचा 125 रुपायांचा प्लॅन
जिओने आणखी एक 125 रुपायांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील युजर्सला मिळणार. याशिवाय 500MB डेटा, एसएमएस, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्युरिटीचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

नुकत्याच टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. एका बाजूला BSNL ने आपल्या 4G सर्विसच्या माध्यमातून काही ऑफर युजर्ससाठी आणल्या आहेत. लवकरच बीएसएनएल आपली 5G सुविधा लाँच करणार आहे. आता कमी किंमतीच्या रिचार्जचा फायदा शासकीय मालकी हक्क असणाऱ्या टेलिकॉम कंपनीकडून घेता येणार आहे.

आणखी वाचा : 

WhatsApp वरून येणारे स्पॅम मेसेज लवकरच होतील ब्लॉक?, जाणून घ्या नवं अपडेट

सणासुदीच्या काळात रेल्वे तिकीट कन्फर्म मिळवण्यासाठी 'हा' पर्याय वापरा

PREV

Recommended Stories

Hyundai ची December Delight बंपर ऑफर, सर्व प्रिमियम कारवर 1 लाखापर्यंतचा डिस्काऊंट!
गाडी अशी की आरामदायी विमानालाही लाजवेल, मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार सर्वात मोठा डिस्काउंट