Pune Airport Update: पुणे विमानतळावरून थेट परदेश प्रवास सुरु! मुंबईला जाण्याची झंझट संपली, आता ‘हा’ दोन देशांचा प्रवास शक्य!

Published : Oct 29, 2025, 06:14 PM IST

Pune Airport Update: पुणे विमानतळावरून 2025 च्या हिवाळी वेळापत्रकानुसार थेट बँकॉक आणि दुबईसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणारय. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइसजेट या कंपन्या ही सेवा देणार असून, पुणे आता देशातील 34 शहरांशी थेट जोडले जाणारय 

PREV
17
पुणेकरांसाठी बिग ब्रेकिंग! आता थेट बँकॉक आणि दुबईला प्रवास

पुणे: आंतरराष्ट्रीय प्रवासाची इच्छा असलेल्या पुणेकरांसाठी मोठी आनंदवार्ता! मुंबई विमानतळावरून प्रवास करण्याची कटकट आता संपली आहे. कारण, पुणे विमानतळावरून थेट बँकॉक आणि दुबईसाठी उड्डाणे सुरू होणार आहेत. 2025 च्या हिवाळी वेळापत्रकानुसार, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट या प्रमुख विमान कंपन्या पुण्यातून या दोन आंतरराष्ट्रीय गंतव्यांसाठी उड्डाण सेवा देणार आहेत. 

27
थेट बँकॉक आणि दुबईला प्रवास, किती वेळा उड्डाणे?

नवीन वेळापत्रकानुसार

बँकॉकसाठी उड्डाणे

एअर इंडिया एक्सप्रेस: दररोज (Daily Flight)

इंडिगो: आठवड्यातून तीन दिवस (बुधवार, शुक्रवार, रविवार) 

37
दुबईसाठी उड्डाणे

स्पाइसजेट आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्या दररोजची उड्डाणे चालवतील.

यामुळे आता पुण्यातून थेट परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोयी उपलब्ध होणार आहेत. 

47
पुणे विमानतळ, देशातील 34 शहरांशी थेट जोडले जाणार!

फक्त आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर देशांतर्गत प्रवासासाठीही पुणे विमानतळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.

आता पुण्यातून थेट 34 शहरांमध्ये उड्डाणे होणार आहेत. 

यामध्ये समावेश असलेली काही प्रमुख शहरे म्हणजे

दिल्ली, मुंबई, बंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, गोवा, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, नागपूर, वडोदरा, भोपाळ, रांची, कोची, कोयंबतूर, वाराणसी, सिंधुदुर्ग, अमृतसर, आणि इतर अनेक शहरे.

57
दररोज 208 उड्डाणांची नवी सोय

हिवाळी वेळापत्रकानुसार, पुणे विमानतळावरून एकूण 208 उड्डाणे दररोज सुरू राहतील.

यामध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या उड्डाणांचा समावेश आहे.

वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता, ही नवी व्यवस्था प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान बनवणार आहे.

67
पर्यटन आणि बिझनेस प्रवासासाठी पुणे बनणार नवीन हब

बँकॉक आणि दुबई ही दोन्ही लोकप्रिय पर्यटनस्थळे असून, आता थेट उड्डाणे सुरू झाल्याने पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट मिळणार आहे. या दोन्ही शहरांकडे प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे हे नवीन आंतरराष्ट्रीय गेटवे ठरणार आहे. 

77
महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर

थेट बँकॉक आणि दुबई उड्डाणे सुरू

2025 हिवाळी वेळापत्रकानुसार लागू

देशातील 34 शहरांशी थेट कनेक्शन

दररोज 208 उड्डाणे

पर्यटन आणि व्यावसायिक प्रवासासाठी मोठा फायदा

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories