पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यात शेअर बाजाराचा कोणताही धोका नसून वार्षिक ७.७% व्याज आणि 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या योजनेत आपले पैसे गुंतवले आहेत.
तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील, तर पोस्ट ऑफिसच्या योजना हा एक उत्तम पर्याय आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही त्यापैकीच एक लोकप्रिय योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या योजनेत गुंतवणूक केल्याची माहिती त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आली होती.
25
५ वर्षांचा लॉक-इन पिरियड
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. शेअर बाजारातील चढ-उतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. मध्यम कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर हा एक भारी पर्याय आहे. तुम्ही यात किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा लॉक-इन पिरियड ५ वर्षांचा असतो.
35
७.७ टक्के दराने चक्रवाढ व्याज
सध्या NSC वर वार्षिक ७.७ टक्के दराने चक्रवाढ व्याज मिळते. पण हे व्याज दरवर्षी न मिळता, ५ वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी दिले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला ७,२४,५१७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला २,२४,५१७ रुपयांचा निव्वळ फायदा होईल. सरकार या योजनेचे व्याजदर ठरवते, त्यामुळे भविष्यात यात बदल होऊ शकतो.
NSC मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्समध्येही सूट मिळते. जुन्या टॅक्स रिजीमची निवड करणाऱ्यांना इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स बेनिफिट मिळतो. यावर मिळणारे व्याज हे उत्पन्न मानले जाते, पण पहिल्या चार वर्षांच्या व्याजावर काही अटींसह टॅक्स सूट मिळते. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की या योजनेसाठी वेगळी कोणतीही विशेष सूट नाही.
55
निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर पंतप्रधानांच्या या संपत्तीचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपत्तीच्या तपशीलात NSC चाही समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकांदरम्यान त्यांनी या योजनेत ७.६१ लाख रुपये गुंतवल्याचे जाहीर केले होते. आता ही रक्कम वाढून सुमारे ९ लाख रुपये झाली असेल. ज्यांना कोणताही धोका न पत्करता आपले पैसे वाढवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना एकदम बेस्ट आहे.