बँकांनी सर्वच बल्क डिपॉझिटसाठी एकच व्याजदर द्यावा, असे कोणतेही बंधन नाही. काही विशिष्ट बल्क डिपॉझिट्सवर वेगवेगळे व्याजदर देण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे. हे नवीन नियम फक्त व्यावसायिक बँकांनाच नाही, तर स्मॉल फायनान्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लोकल एरिया बँका, पेमेंट बँका आणि नागरी सहकारी बँकांनाही लागू होणार आहेत.