Post Office Kisan Vikas Patra : पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) ही सरकारद्वारे दिली जाणारी एक सुरक्षित, दीर्घकालीन बचत योजना आहे. यात पैसे गुंतवल्यास ते सुरक्षित राहतात आणि दुप्पटही होतात. त्यावर टॅक्समध्ये सुटही मिळते. जाणून घ्या.
पैसे सुरक्षितपणे वाढावेत असं वाटतं? मग पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना तुमच्यासाठीच आहे. ही सरकारी हमी असलेली एक दीर्घकालीन बचत योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो.
24
फक्त ₹1000 पासून गुंतवणूक सुरू करा
या योजनेत किमान ₹1000 गुंतवू शकता. त्यानंतर ₹100 च्या पटीत गुंतवणूक वाढवता येते. कमाल मर्यादा नाही. सध्या वार्षिक 7.5% व्याजदर आहे. 115 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट होते.
34
हे खाते कोण उघडू शकते?
एक व्यक्ती किंवा तीन व्यक्ती मिळून जॉइंट खाते उघडू शकतात. पालकांना मुलांच्या नावाने खाते उघडता येते. १० वर्षांवरील मुले स्वतःच्या नावाने खाते उघडून ते चालवू शकतात.
काही विशेष परिस्थितीत, KVP खाते मुदतीपूर्वी बंद करता येते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा न्यायालयाच्या आदेशाने हे शक्य आहे. सुरक्षित परतावा हवा असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.