Honda Activa 125 vs Suzuki Access 125 : भारतातील लोकप्रिय 125cc स्कूटर्स, Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 यांच्या परफॉर्मन्स, वजन, फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
भारतात 125cc स्कूटर सेगमेंट खूप लोकप्रिय आहे. यात Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 या सर्वाधिक पसंतीच्या मॉडेल्स आहेत. दोन्हीचा अनुभव वेगळा आहे. Activa 125 स्मूथ चालते, तर Access 125 थोडी स्पोर्टी आहे. रोजच्या प्रवासासाठी दोन्ही उत्तम आहेत.
24
होंडा ॲक्टिव्हाची माहिती
दोन्ही स्कूटर्स 8.2 bhp पॉवर देतात. पण इंजिन ट्युनिंग वेगळी आहे. ॲक्टिव्हा 125 स्मूथपणे वेग पकडते, जी गर्दीत चालवण्यासाठी उत्तम आहे. तर ॲक्सेस 125 चा पिकअप जलद आहे आणि ती स्पीडी फील देते.
34
सुझुकी ॲक्सेसची माहिती
ॲक्सेस 125 (106 किलो) ॲक्टिव्हा 125 (107 किलो) पेक्षा हलकी आहे. कंट्रोल आणि बॅलन्समध्ये ॲक्टिव्हा 125 चांगली आहे. वाहतुकीत सहज हाताळण्यासाठी ॲक्सेस 125 आणि आरामदायी प्रवासासाठी ॲक्टिव्हा 125 उत्तम आहे.
ॲक्टिव्हा 125 मध्ये LED लाईट्स, सायलेंट स्टार्ट, TFT डिस्प्ले मिळतात. ॲक्सेस 125 मध्ये ब्लूटूथ, मोठी सीट आणि जास्त स्टोरेज आहे. ॲक्सेसची किंमत ₹77,284 पासून आणि ॲक्टिव्हाची ₹88,339 पासून सुरू होते.