ई-केवायसी न केल्यास पैसे थांबतील:
जर तुम्ही ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला 21वा हप्ता मिळणार नाही. सरकारने सर्व लाभार्थ्यांना ठराविक वेळेत ई-KYC करण्याचे निर्देश दिले आहेत.
भू-सत्यापन न झाल्यासही अडचण:
शेतजमिनीचे भू-सत्यापन (land verification) झाले नसल्यास तुमची रक्कम अडकू शकते. हे पाऊल पूर्ण करणे हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
आधार लिंक नसेल तर हप्ता मिळणार नाही:
जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. म्हणून तात्काळ बँकेत जाऊन आधार लिंकिंग पूर्ण करा.