PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी पेन्शनचा "बोनस"! दरवर्षी खात्यात जमा होणार ₹36,000, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published : Aug 07, 2025, 09:54 PM IST

PM Kisan Mandhan Yojana: केंद्र सरकारने PM किसान मानधन पेन्शन योजना आता PM किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळेल.

PREV
18

PM Kisan Mandhan Yojana: देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने PM किसान मानधन पेन्शन योजना आता PM किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडली असून, यामुळे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा ₹3,000, म्हणजेच वर्षाला ₹36,000 इतकी पेन्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नाही.

28

मुख्य वैशिष्ट्ये

पीएम किसान योजनेशी जोडलेली पेन्शन योजना

वयाच्या 60 नंतर दरमहा ₹3,000 (वार्षिक ₹36,000 पेन्शन)

कोणतेही नवीन कागदपत्र आवश्यक नाही

नोंदणीसाठी फक्त CSC (सार्वजनिक सेवा केंद्र) ला भेट द्या

38

काय आहे ही योजना?

जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर सरकारने सुरू केलेल्या या नवीन पेंशन योजनेचा लाभ तुम्हाला सहजपणे घेता येऊ शकतो. PM किसान मानधन योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळासाठी सुरक्षितता प्रदान करते. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ₹36,000 रुपये पेन्शन स्वरूपात जमा होतात आणि हे सगळं PM किसान योजनेच्या निधीतून केले जाते. म्हणजेच, खिशातून कोणतीही अतिरिक्त रक्कम द्यायची गरज नाही.

48

कोण पात्र आहे?

वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असलेला कोणताही शेतकरी

PM किसान योजनेचा लाभार्थी असणं आवश्यक

60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होते

नोंदणीनंतर एक विशेष पेन्शन ID दिली जाते

58

नोंदणी कशी कराल?

शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन नोंदणी करायची आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक

जमीन संबंधित कागदपत्र

पासपोर्ट साईझ फोटो

CSC ऑपरेटर तुमच्याकडून ही माहिती घेऊन ऑनलाइन फॉर्म भरेल. यामध्ये एक ऑटो-डेबिट फॉर्म देखील भरला जातो, ज्यामुळे मासिक योगदान थेट बँकेमार्फत वजा होतं.

68

पेन्शन कशी मिळेल?

उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचं वय 40 वर्षे असेल आणि तो योजनेत नोंदणी करतो, तर त्याला दरमहा फक्त ₹200 योगदान करावं लागेल ते देखील PM किसान निधीतून आपोआप वजा होईल. यामुळे, 60 वर्षांनंतर कोणतेही योगदान न करता दरमहा ₹3,000 पेन्शन मिळत राहील.

78

दुहेरी फायदा, पक्की सुरक्षितता

ही योजना म्हणजे दोन फायदे एकाच ठिकाणी

PM किसान योजनेचा वार्षिक ₹6,000 चा लाभ

आणि त्याच पैशातून वृद्धापकाळासाठी ₹36,000 पेन्शनचा लाभ

88

शेतकरी बांधवांनो, वेळ वाया न घालवता तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन नोंदणी करा आणि तुमच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories