मुंबई - पुणेकर आणि दादरकरांसारखेच बंगळुरुकर खवय्ये आहेत. त्यांना वेगवेगळ्या डिशेस टेस्ट करायला आवडते. मग तो पदार्थ कुठलाही का असेना… बंगळुरुच्या रेस्तरॉंत पारंपरिक कोरियन बिंग्सू नावाचे डेझर्ट खूप फेमस होत आहे. जाणून घ्या या डेझर्टबद्दल..
गेल्या काही वर्षांपासून बंगळुरूमध्ये कोरियन आणि इतर आशियाई पदार्थ खूपच लोकप्रिय झाले आहेत. तरुणांच्या आवडीचे पदार्थ देणारी रेस्टॉरंट्सही भरपूर आहेत. आता शहरात वाढत्या रेस्टॉरंट्समध्ये पारंपरिक कोरियन डेझर्ट बिंग्सू खूपच हायलाइट होत आहे.
27
तरुणाईतही ठरतेय लोकप्रिय
गेल्या एक-दोन वर्षांत आशियाई डेझर्ट्सबद्दलची आवड लक्षणीयरीत्या वाढली आहे, विशेषतः तरुणांमध्ये. बिंग्सू तर सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. बहुतेक कॅफे आणि डेझर्टच्या ठिकाणी हेच आता चालतंय.
37
सोशल मीडियावर होतोय फेमस
बिंग्सू ट्रेंड होण्यामागे सोशल मीडियाचं कारण आहे असं म्हटलं जातंय. तेव्हा बिंग्सू म्हणजे काय हेही बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. पण आता लोकांना याबद्दल जास्त माहिती आहे. जनरेशन झेडच्या तरुणांना बिंग्सू आकर्षक वाटत असल्याने सोशल मीडियावर त्याचे चांगले फोटो पोस्ट करणं याचा ट्रेंड सेट होतोय.
बिंग्सू मशीन्स आता भारतात सहज उपलब्ध आहेत, दक्षिण कोरियातून आयात करण्याची गरज नाही, म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात सर्वांना मिळत आहे. पारंपरिकपणे या पदार्थावर लाल बीन्स पेस्ट, दूध आणि नट्सचा चुरा भुरभुरतात. हा पदार्थ १३९० च्या जोसेन राजवंशापेक्षाही जुना आहे आणि उन्हाळ्यात खूप लोकप्रिय आहे.
57
भारतीय चवीचा टचही येतोय
बंगळुरूतील दुकाने बिंग्सूला भारतीय चवीशी जुळवून घेत आहेत. कोरियन लोक बर्फाऐवजी दूध वापरण्याचा प्रयोग करतात. तसेच, हंगामी फळे, फळांचा रस इत्यादीही घालतात.
67
जिभेवर ठेवल्यावर लगेच वितळते
"बिंग्सू हा पदार्थ ज्यांना माहीत नाही अशा स्थानिकांनाही आकर्षित करत आहे. हा पदार्थ सहसा अतिशय प्रभाविपणे सादर केला जातो. बिग्सूचे हटके डिझाइन लोकांना पुन्हा पुन्हा येण्यास प्रवृत्त करते. डिझाइन इतर कोणत्याही मिठाईपेक्षा वेगळे आहे. खरं सांगायचं तर ते आईस्क्रीमसारखं वाटत नाही कारण ते जिभेवर ठेवल्यावर लगेच वितळते. हा एक वेगळाच अनुभव आहे," असे विक्रेते सांगतात.
77
बिंग्सू म्हणजे नेमके काय?
बिंग्सू, ज्याला बिंगसू किंवा कोरियन बर्फाचा गोळा असेही म्हणतात, हा एक लोकप्रिय कोरियन थंड पदार्थ आहे. या मिठाईमध्ये अत्यंत बारीक केलेला बर्फ, गोडसर साखरघातलेले दूध (कंडेन्स्ड मिल्क) आणि त्यावर फळांचे तुकडे, फळांचा सिरप, लाल बीन्स (राजमा), तसेच तांदळाचे केक (राईस केक्स) अशा विविध टॉपिंग्ज असतात. उन्हाळ्यात विशेषतः लोकप्रिय असलेला हा पदार्थ चवदार आणि अत्यंत थंडगार असतो, त्यामुळे तो उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो.