PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. 2019 साली सुरू झालेल्या या योजनेनुसार रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. योजनेंचा 21 वा हप्ता सोमवारी देशभरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. तामिळनाडूतील कोयंबटूर येथे झालेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जारी केला. या माध्यमातून 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा झाले. अनेक शेतकऱ्यांनी यामुळे मोठा दिलासा व्यक्त केला.
बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हप्ता पुढे ढकलण्याच्या चर्चा होत्या; परंतु केंद्र सरकारने नियोजित वेळापत्रकानुसारच 19 नोव्हेंबर रोजीच रक्कम जारी केली. मात्र, यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. अनेकांना प्रश्न पडला “आमच्या खात्यात 2,000 रुपये का आले नाहीत?” याची मुख्य कारणे कोणती, आणि ती कशी दुरुस्त करायची ते पाहूयात.