Vehicle Fitness Test Fee Hike: केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार वाहन फिटनेस चाचणीच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. आता १० वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांपासूनच वाढीव दर लागू होणार असून, वाहनांच्या वयानुसार शुल्काचे तीन गट तयार केले आहेत.
केंद्र सरकारच्या Central Motor Vehicles (Fifth Amendment) Rules, 2025 अंतर्गत वाहन फिटनेस चाचणीचे शुल्क आता नव्या पद्धतीनुसार आकारले जाणार आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आधी जे जास्त दर 15 वर्षांनंतर लागू होत होते, ते आता 10 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांपासूनच लागू होतील. त्यामुळे लाखो वाहनधारकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.
27
वाहनांच्या वयानुसार तीन विभाग
नवीन नियमांनुसार वाहनांना वयानुसार तीन गटात विभागले आहे.
10–15 वर्षे
15–20 वर्षे
20 वर्षांपेक्षा जास्त
हे नियम मोटारसायकल, तीन-चाकी, चौरचाकी (quadricycle), LMV, मध्यम व जड व्यावसायिक वाहनांवर लागू होतात. वाहनाचे वय वाढेल तसे फिटनेस फीही जास्त आकारली जाईल.
20 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी सर्वाधिक फी
दुचाकी: ₹1,000
तीन-चाकी व LMV: ₹2,000
मध्यम माल/प्रवासी वाहने: ₹2,600
जड व्यावसायिक वाहने: ₹3,000
हे नवे शुल्क सूचना प्रसिद्ध झाल्याच दिवशी लागू होतील.
67
जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी मोठी वाढ
सरकारने 20 वर्षांपेक्षा अधिक जुन्या कमर्शियल वाहनांसाठी फिटनेस फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
हॅवी ट्रक/बस: ₹25,000
मध्यम व्यावसायिक वाहन: ₹20,000
LMV (Light Motor Vehicle): ₹15,000
तीन-चाकी: ₹7,000
दुचाकी: पूर्वी ₹600 - आता ₹2,000
77
जुन्या वाहनांचे फिटनेस टेस्ट खर्च वाढणार
या नव्या नियमांमुळे जुन्या वाहनांचे फिटनेस टेस्ट खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असून वाहनधारकांनी त्यांच्या गाडीच्या वयानुसार तयारी ठेवणे आवश्यक आहे. सरकारचे उद्दिष्ट म्हणजे रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हेच आहे.