PM Kisan Yojana : मोठी बातमी! PM किसान योजनेत सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'; आता प्रत्येक शेतकऱ्याला 'हा' नियम बंधनकारक, अन्यथा पैसे मिळणार नाही!

Published : Dec 06, 2025, 06:21 PM IST

PM Kisan Yojana : पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन अटीमुळे योजनेत पारदर्शकता वाढेल आणि केवळ पात्र शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत मिळेल. 

PREV
16
शेतकऱ्यांना पैसे मिळवायचे असल्यास हे करणे बंधनकारक!

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पीएम-किसान योजनेत आता नवीन अट लागू करण्यात आली आहे. यापुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे बंधनकारक राहणार आहे. सरकारच्या मते, ही अट लागू केल्याने लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि आर्थिक मदत थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. 

26
पीएम-किसान योजनेत बदल

आत्तापर्यंत पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 थेट बँक खात्यात जमा केले जात होते. मात्र, अनेक ठिकाणी

चुकीची नोंदणी,

अपूर्ण कागदपत्रे,

अपात्र लाभार्थी

मुळे अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले. यावर उपाय म्हणून आता शेतकरी ओळखपत्र प्रणाली लागू केली जात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, शेतकरी आयडी नसल्यास पीएम-किसान हप्ता थांबवला जाऊ शकतो. 

36
शेतकरी ओळखपत्राची गरज का?

सरकार शेतीशी संबंधित सर्व योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या तयारीत आहे. यात पिक विमा, पीक कर्ज, अनुदान, खतवाटप आणि पीएम-किसान योजनेचा समावेश आहे.

46
प्रत्येक शेतकऱ्याची एकमेव डिजिटल ओळख

अनेक ठिकाणी पुन्हा नोंदणीची गरज भासत नाही,

चुकीच्या नोंदी आणि दुहेरी लाभ रोखता येतात,

भविष्यात नवीन योजना सुरु झाल्यास पात्र शेतकऱ्यांना आपोआप लाभ मिळतो. 

56
शेतकऱ्यांसाठी फायदे

डिजिटल नोंदणीमुळे

सरकारी योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल,

फसवणूक आणि चुकीच्या लाभांना आळा बसेल,

शासनाला अद्ययावत माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध राहील. 

66
शेतकऱ्यांनी काय करावे?

PM Kisan योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी

ई-केवायसी पूर्ण असणे,

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.

शेतकरी आयडी क्रमांक मिळाल्यानंतर तो सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories