नोव्हेंबर महिन्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी वाढ झाली असून मारुती सुझुकीने विक्रीचे विक्रम रचले आहेत. मारुतीने २,२९,०९१ युनिट्स विकल्या, तर टाटा मोटर्स आणि महिंद्रानेही २२% वाढ नोंदवली. याउलट, ह्युंडाईच्या विक्रीत केवळ ४% वाढ दिसून आली.
नोव्हेंबर महिन्यात या कंपनीचं भाग्य उजळलं, गाड्यांच्या विक्रीचा आकडा ऐकून पाठीला येईल बाक
ऑटोमोबाईल क्षेत्र सध्या बूममध्ये असून अनेक कंपन्यांच्या गाड्यांची चांगल्या प्रकारे विक्री सुरु झाली आहे. मारुती सुझुकी कंपनीने गाड्यांच्या विक्रीमध्ये आघाडी घेतली आहे. मारुती सुझुकी कंपनीसाठी हा महिना महत्वाचा ठरला आहे.
26
नोंव्हेंबरमध्ये विक्रीचे रचले विक्रम
नोंव्हेंबरमध्ये मारुती सुझुकी कंपनीने विक्रीचे मोठं मोठे आकडे रचले आहेत. नोंव्हेंबरमध्ये या कंपनीने विक्रीचे मोठे आकडे रचले असून २,२९,०९१ युनिट्स गाड्यांची विक्री केली आहे.
36
पेसेंजर गाड्यांची झाली चांगली विक्री
मारुती सुझुकीच्या गाड्यांची चांगली विक्री झाली आहे. पॅसेंजर गाड्यांमध्ये या कंपनीची १,७०,९७१ पर्यंत या कंपन्यांच्या युनिट्सची विक्री झाली आहे. छोट्या कारमध्ये कंपनीच्या गाड्यांची विक्री झाली.
टाटा मोटर्सने घरच्या बाजारात ५७,४३६ गाड्यांची विक्री केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत २२% गाड्यांची जास्त विक्री झाली आहे. पंच, कर्व सारख्या गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.
56
तिसऱ्या क्रमांकावर महिंद्रा
तिसऱ्या क्रमांकावर महिंद्रा कंपनी असून SUV गाड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. नोंव्हेंबर २०२५ मध्ये कंपनीने ५६,३३६ गाड्यांची विक्री केली आहे. मागच्या वर्षीपेक्षा कंपनीने २२% अधिक गाड्यांची विक्री केली आहे.
66
ह्युंडाईच्या गाड्यांच्या विक्रीत फक्त ४% वाढ
हुंडाई कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत फक्त ४% वाढ झाली आहे. कंपनीने ५०,३४० गाड्या विकल्या असून क्रेटा आणि व्हेन्यू या गाड्यांची सर्वात जास्त विक्री झाली आहे.