पोस्ट पेमेंट बँक खातेधारकांना पॅन कार्ड अपडेटच्या नावाखाली फसवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय पोस्ट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून कसे दूर रहाल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
PAN Card Fraud : सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक खातेधारकांना (IPPB) निशाण्यावर धरत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये नागरिकांना मोबाइलवर एक मेसेज येत त्यामध्ये पॅन कार्ड अपडेट करावे असे सांगितले जात आहे. अन्यथा पोस्ट खाते सुरू ठेवण्यास अडथळा येईल अशी सूचना देण्यात आली आहे. अशाप्रकारच्या मेसेजमध्ये बनावट लिंक असून यावर क्लिक केल्यास नागरिकाची सर्व संवेदनशील माहिती फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचली जाऊ शकते.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) यांच्याकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पॅन कार्ड अपडेट न केल्यास इंडियन पोस्ट पेमेंट बँक खाते ब्लॉक होईल असा दावा करण्यात आल्याचे म्हटले आहे. यावर पीआयबीने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, मेसेजमधील दावा खोटा आहे. याशिवाय इंडिया पोस्टकडून कधीच अशाप्रकारचा मेसेज पाठवला जात नसल्याचेही पीआयबीने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन नये अशी विनंतीही करण्यात आली आहे.
फिशिंगमध्ये व्यक्तीची ऑनलाइन स्वरुपात फसवणूक होते. यामध्ये फसवणूक करणाऱ्यांकडून व्यक्तीची संवेदनशील माहिती जसे की, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा पिन कार्ड अशी माहिती मिळवतात. सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या प्रकरणात फसवणूकदार नागरिकांना पॅन कार्ड अपडेट करा अन्यथा खात्यासाठी अडथळा येईल असा मेसेज पाठवत आहेत. या फसवणूकीपासून दूर राहण्यासाठीच पीबीआयबीने नागरिकांना अॅलर्ट केले आहे.
हेही वाचा : आधार कार्डच्या माध्यमातून सुरू करू शकता पोस्टात खाते, वाचा नवे अपडेट
आणखी वाचा :
EPFO ची सर्वांसाठी महत्त्वाची सूचना! तुमच्या खात्याची सुरक्षा कशी करावी?
५००० रुपयांतून सुरू करा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय, कमवा ४०-५० हजार