भारतीय घरातील स्वयंपाकाची सुरुवात ज्या भाजीपासून होते, ती म्हणजे कांदा. बिर्याणीपासून भाजीपर्यंत, अगदी चटण्या-पराठ्यांमध्येही कांदा अपरिहार्य आहे. त्यामुळे कांद्याचे महत्त्व स्वयंपाकघरात वेगळे सांगायला नको. मात्र, अनेकदा कांदे आणल्यानंतर त्यावर काळ्या रंगाचे डाग दिसतात. हे डाग नेमके काय असतात? त्यामागे कोणती कारणे आहेत? आणि असे कांदे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हा प्रश्न अनेकांना पडतो.
25
काळे डाग म्हणजे काय?
कांद्यांवर दिसणारे हे काळे डाग म्हणजे एक प्रकारची बुरशी (फंगस) असते. वैज्ञानिक भाषेत तिला Aspergillus niger असे म्हणतात. ही बुरशी केवळ कांद्यांवरच नाही तर द्राक्षे, शेंगदाणे, मिरच्या, काही फळांवर आणि भाज्यांवरही दिसते.
आरोग्यावर होणारे परिणाम
संशोधनानुसार, ही बुरशी फारशी धोकादायक नसते. मात्र, काही संवेदनशील लोकांमध्ये ती अॅलर्जीस कारणीभूत ठरू शकते. अशा कांद्याचे सेवन केल्यानंतर पुढील त्रास उद्भवू शकतात:
मळमळ, उलट्या
पोटदुखी किंवा जुलाब
डोकेदुखी
अॅलर्जीक रॅशेस
दमा किंवा श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांना अधिक धोका
विशेषतः ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना अशा कांद्यांपासून दूर राहणेच योग्य आहे. कारण त्यामुळे त्यांच्या श्वसनासंबंधी समस्या तीव्र होऊ शकतात.
35
सुरक्षित वापर कसा करावा?
काळे डाग असलेले कांदे सर्वस्वी वाया घालवण्याची गरज नाही. काही सोप्या उपायांनी ते सुरक्षितपणे वापरता येऊ शकतात:
कांदे पाव तास पाण्यात भिजवून ठेवावेत.
हाताने चोळून नीट स्वच्छ धुवावेत.
बाहेरची साल आणि वरचे डाग काढून टाकावेत.
जर कांदा पूर्णपणे काळवंडलेला असेल, तर तो टाकून देणेच योग्य.
ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात, त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
सर्दी, खोकला, डोळ्यांचे काही त्रास यांवरही कांद्यांचे सेवन उपयुक्त असते.
55
स्वच्छ धुवून वापरा
कांद्यांवरील काळे डाग म्हणजे बुरशी असली तरी ती नेहमी धोकादायक नसते. मात्र जास्त प्रमाणात डाग असलेले कांदे टाळणेच शहाणपणाचे ठरेल. योग्य पद्धतीने धुवून, स्वच्छ करून वापरलेले कांदे आरोग्यास कोणताही धोका निर्माण करत नाहीत. त्यामुळे काळे डाग दिसले तरी घाबरण्याचे कारण नाही; पण थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे.