सप्टेंबर 2025 च्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, सोमवारी 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 2,404 रुपयांनी वाढून 1,04,792 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याची किंमत 76,162 रुपये होती. तेथून आजवर 28,630 रुपयांची उसळी घेत सोन्याने विक्रमी पातळी गाठली आहे.