शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानपाठोपाठ 'नमो शेतकरी'चे २,००० रुपये येणार; पाहा कधी जमा होणार हप्ता?

Published : Feb 17, 2026, 05:20 PM IST

Namo Shetkari Yojana 8th Installment Date: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. तांत्रिक कारणांमुळे रखडलेला हा हप्ता फेब्रुवारी अखेरीस, मार्चच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यताय. 

PREV
15
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानपाठोपाठ 'नमो शेतकरी'चे २,००० रुपये येणार

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो बळीराजासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'पीएम किसान' योजनेच्या धर्तीवर सुरू झालेल्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या ८व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हप्ता लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र आता वितरणाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 

25
हप्ता रखडण्याचे नेमके कारण काय?

नमो शेतकरी योजनेचा ८वा हप्ता तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

लाभार्थी यादीचे प्रमाणीकरण: पात्र शेतकऱ्यांच्या यादीचे नूतनीकरण (Update) सुरू आहे.

बँक खाते पडताळणी: आधार लिंक आणि डीबीटी (DBT) प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

डेटाबेस सिंक: केंद्र आणि राज्य सरकारच्या डेटाबेसमधील तांत्रिक ताळमेळ बसवण्याचे काम सुरू आहे. 

35
२,००० की ४,०००? काय आहे शक्यता?

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा ८वा हप्ता प्रलंबित आहे, तर काही ठिकाणी ९व्या हप्त्याची वेळ जवळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकार दोन हप्ते एकत्र (म्हणजेच ४,००० रुपये) देणार की केवळ ८वा हप्ता जमा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

45
नेमके पैसे कधी जमा होणार?

ताज्या अपडेटनुसार, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात (होळीच्या सुमारास) हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होऊ शकतो. पीएम किसानचा २१वा हप्ता आधीच जमा झाला असल्याने, आता राज्य सरकार आपली ही रक्कम लवकरच वर्ग करण्याच्या तयारीत आहे. 

55
महत्त्वाची टीप

तुमचा हप्ता वेळेत मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही आणि e-KYC पूर्ण झाले आहे का, याची खात्री करून घ्या.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories