उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंग पडू नये म्हणून काय करायला हवं, जाणून घ्या माहिती

Published : Feb 17, 2026, 02:56 PM IST

उन्हाळ्यात टॅनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे आणि चेहरा झाकणे आवश्यक आहे. यासोबतच, नियमित चेहरा स्वच्छ ठेवणे, घरगुती उपायांचा वापर करणे आणि भरपूर पाणी पिण्याने त्वचेचे संरक्षण होते व टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते.

PREV
17
उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंग पडू नये म्हणून काय करायला हवं, जाणून घ्या माहिती

चेहऱ्यावर उन्हाळ्यात बाहेर पडल्यावर टॅनिंगचा त्रास जाणवायला लागतो, अशावेळेला आपण काय करू शकतो हे जाणून घ्यायला हवं. टॅनिंगचा त्रास होऊ नये म्हणून घरच्याघरी कोणते उपाय करता येतील ते जाणून घेऊयात. 

27
सनस्क्रीन लावायला विसरू नका

उन्हाळ्यात बाहेर पडण्याआधी SPF 30 किंवा त्याहून जास्त असलेलं सनस्क्रीन चेहऱ्यावर आणि मानेला लावा. दर 2–3 तासांनी पुन्हा लावणं महत्त्वाचं आहे.

37
थेट सूर्यप्रकाश टाळा

दुपारी 11 ते 4 या वेळेत सूर्यकिरण सर्वाधिक तीव्र असतात. शक्य असल्यास या वेळेत बाहेर जाणं टाळा किंवा छत्री, स्कार्फचा वापर करा.

47
चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ किंवा कॅप वापर करा

बाहेर जाताना कॉटन स्कार्फ, टोपी किंवा कॅप वापरल्यास थेट उन्हापासून त्वचेचं संरक्षण होतं आणि टॅनिंग कमी होतं.

57
चेहरा नियमित स्वच्छ ठेवा

घाम आणि धूळ साचल्यामुळे टॅनिंग वाढतं. दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

67
घरगुती उपायांचा वापर करा

आठवड्यातून 2 वेळा दही + बेसन, एलोवेरा जेल किंवा गुलाबपाणी लावल्यास त्वचा थंड राहते आणि टॅनिंग कमी होतं.

77
भरपूर पाणी प्या

दररोज 8–10 ग्लास पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि उन्हामुळे होणारे डॅमेज कमी होतं.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories