Mobile Market: Xiaomi 17 Ultra ची किंमत ऐकून स्मार्टफोन मार्केटला धक्का!

Published : Mar 07, 2026, 09:50 PM IST

Mobile Market: Xiaomi लवकरच आपली नवी 17T सीरिज भारतात लाँच करू शकते. ही सीरिज एप्रिल-मे महिन्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच, Xiaomi 17 सीरिजच्या किंमतीबद्दलही एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे मोबाईल मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे.

PREV
16
Xiaomi 17 Ultra
स्मार्टफोन कंपनी Xiaomi येत्या 11 मार्चला भारतात 'Xiaomi 17' आणि 'Xiaomi 17 Ultra' हे फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. पण आता कंपनी चाहत्यांसाठी अजून एक खुशखबर घेऊन आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Xiaomi पहिल्यांदाच भारतात आपली 'T-Series' आणणार आहे. यात 'Xiaomi 17T' आणि 'Xiaomi 17T Pro' हे दोन प्रीमियम मिड-रेंज मॉडेल्स लवकरच लाँच होऊ शकतात.
26
फोनची वैशिष्ट्ये काय?
प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17T सीरिज भारतात एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. लीकनुसार, या फोन्समध्ये Leica लेन्ससह 50MP + 12MP + 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा असू शकतो. 'Xiaomi 17T' मध्ये MediaTek Dimensity 8500 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह 6,500mAh बॅटरी, तर 'Xiaomi 17T Pro' मध्ये Dimensity 9500 चिपसेट आणि 100W फास्ट चार्जिंगसह 8,500mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.
36
अतिरिक्त फीचर्स
प्रो मॉडेलमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात 165Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा OLED 1.5K डिस्प्ले, अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर, इन-बिल्ट कूलिंग फॅन आणि मेटल फ्रेम यांचा समावेश असू शकतो.
46
Xiaomi 17 ची किंमत किती?
11 मार्चला लाँच होणाऱ्या फ्लॅगशिप मॉडेल्स, म्हणजेच Xiaomi 17 आणि 17 Ultra, यांच्या भारतीय किंमतीबद्दलही माहिती लीक झाली आहे. ही माहिती Xiaomi च्या चाहत्यांसाठी थोडी धक्कादायक असू शकते.
56
नवीन Xiaomi 17 मॉडेलची किंमत लाखाच्या घरात?
कारण, गेल्या वर्षी लाँच झालेल्या Xiaomi 15 ची किंमत 64,999 रुपये होती. पण आता नवीन Xiaomi 17 मॉडेलची किंमत 1 लाखाच्या जवळ जाऊ शकते, असं म्हटलं जातंय. तर, टॉप-एंड मॉडेल असलेल्या Xiaomi 17 Ultra ची किंमत तब्बल 1.4 लाख रुपये ठेवली जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
66
कठीण स्पर्धा
जर ही किंमत खरी ठरली, तर Xiaomi ला बाजारात कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल. कारण OPPO Find X9 आणि Vivo X300 सारखे फोन्स 80,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे, कंपनीच्या अधिकृत घोषणेपर्यंत वाट पाहणंच योग्य ठरेल.
Read more Photos on

Recommended Stories