Mobile Market: Realme ने भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आपला नवीन मॉडेल सादर केला आहे. हा स्मार्टफोन खास करून जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि चांगल्या दैनंदिन वापरासाठी बनवला आहे.
या फोनमध्ये बजेट किमतीत 5G सपोर्ट, तब्बल 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असे जबरदस्त फीचर्स आहेत. गेमिंग आणि सतत व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
27
Realme C83 5G स्मार्टफोन
Realme C83 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh क्षमतेची 'टायटन बॅटरी' आहे. जे लोक जास्त वेळ सोशल मीडिया, स्ट्रीमिंग आणि गेमिंग करतात, त्यांना ही बॅटरी जबरदस्त बॅकअप देते. या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगची सोयही आहे. चांगल्या कामगिरीसाठी, यात 6nm फॅब्रिकेशनवर बनवलेला MediaTek Dimensity 6300 चिपसेट दिला आहे.
37
6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज
हा रियलमी स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. डायनॅमिक रॅम फीचरमुळे तुम्ही 18GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम वाढवू शकता. तसेच, यात 2TB पर्यंत मेमरी कार्ड वापरण्याचीही संधी आहे.
रियलमी C83 5G फोनमध्ये 6.7-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. साधारणपणे बजेट फोनमध्ये 90Hz किंवा 120Hz रिफ्रेश रेट असतो, पण या फोनमध्ये कंपनीने 144Hz अॅडाप्टिव्ह रिफ्रेश रेट दिला आहे. यामुळे स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन खूपच स्मूथ दिसतात.
57
'वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम'
सतत वापरताना फोन गरम होऊ नये यासाठी, या सेगमेंटमधील सर्वात मोठी 5334mm² 'वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम' यात दिली आहे. तसेच, फोनचा ब्राइटनेस आणि ऑडिओ आपोआप वाढवणारा नवीन 'AI आउटडोअर मोड' देखील यात आहे.
67
दोन आकर्षक रंग
फोटो काढण्यासाठी यात 13MP AI रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे. रोजच्या वापरासाठी ही कॅमेरा सिस्टीम चांगली आहे. या फोनला मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स आणि IP64 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे, खाली पडल्यास किंवा पाण्यात पडल्यास तो सहजासहजी खराब होत नाही. हा फोन ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
77
किंमत
या फोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत ₹13,499, 4GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत ₹14,499 आणि टॉप-एंड 6GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत ₹17,499 आहे. याची पहिली विक्री 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, रियलमी वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.