MHADA Lottery 2026 : म्हाडा २०२६ मध्ये मुंबई, पुणे आणि कोकण मंडळासाठी मोठ्या गृहनिर्माण सोडती जाहीर करणार आहे. या अंतर्गत, मुंबईतील पुनर्विकास प्रकल्प आणि एमएमआरमधील ग्रोथ हबच्या माध्यमातून लाखो परवडणारी घरे उपलब्ध होतील.
म्हाडाची नववर्षाची भेट! मुंबई, पुणे आणि कोकणात घरांची बंपर लॉटरी
मुंबई : नवीन वर्षात स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती करू इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने (MHADA) आनंदाची बातमी आणली आहे. २०२६ मध्ये मुंबई, पुणे आणि कोकण या तीन महत्त्वाच्या मंडळांच्या गृहनिर्माण सोडती जाहीर होणार आहेत. केवळ शहरच नाही, तर एमएमआर (MMR) भागातही घरांचे मोठे जाळे विणले जात असून, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
25
कोणत्या शहरात किती संधी?
म्हाडाने २०३० पर्यंतचे जे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे, त्याअंतर्गत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जात आहे.
मुंबई: बीडीडी चाळ आणि मोतीलाल नगर सारख्या मोठ्या पुनर्विकास प्रकल्पातून सुमारे ६ लाख नवी घरे उपलब्ध होणार आहेत.
एमएमआर रिजन: ग्रोथ हबच्या माध्यमातून ८ लाख घरांचे भव्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे आणि कोकण: या भागांतही वाढत्या नागरीकरणानुसार हजारो घरांची लॉटरी प्रक्रिया राबवली जाईल.
35
मुंबईतील 'या' हाय-प्रोफाईल प्रकल्पांवर लक्ष ठेवा!
पुनर्विकास प्रकल्पांतून म्हाडाच्या वाट्याला येणाऱ्या घरांची संख्या मोठी आहे. यात प्रामुख्याने खालील भागांचा समावेश असेल.
वरळी: आदर्श नगर आणि बीडीडी चाळ.
वांद्रे: वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास.
अंधेरी-जोगेश्वरी: सरदार वल्लभभाई पटेल नगर आणि पूनम नगर.
इतर: पंजाबी कॉलनी (GTB नगर), पत्राचाळ आणि अभ्युदय नगर.
सध्याच्या राजकीय घडामोडी आणि आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर, म्हाडा या सोडतींचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. २०२६ च्या सुरुवातीच्या काळातच या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
55
अर्जदारांसाठी महत्त्वाची टीप
म्हाडाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन (IKMS) पद्धतीने पार पडते. त्यामुळे तुम्ही नवीन वर्षाच्या सोडतीसाठी 'म्हाडा गृहनिर्माण'च्या अधिकृत पोर्टलवर आधीच नोंदणी करून आपली प्रोफाइल अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .