एमजी कंपनीच्या या गाडीवर मिळणार ४ लाखांचा फायदा, या तारखेपर्यंत राहणार ऑफर

Published : Dec 12, 2025, 05:54 PM IST

डिसेंबर महिन्यात एमजी मोटर्स आपल्या विविध कार मॉडेल्सवर आकर्षक इयर-एंड डिस्काउंट देत आहे. यामध्ये एमजी कॉमेट ईव्हीवर १ लाख, हेक्टरवर ९०,०००, तर ग्लॉस्टरवर तब्बल ४ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. नवीन कार खरेदीसाठी ही एक उत्तम संधी आहे.

PREV
16
एमजी कंपनीच्या या गाडीवर मिळणार ४ लाखांचा फायदा, या तारखेपर्यंत राहणार ऑफर

नवीन वर्षात कार खरेदी करायची असेल तर डिसेंबर महिना आपल्यासाठी खास ठरणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ग्राहकांना वर्ष आणि ऑफर्स अंतर्गत मिळणारे फायदे मिळत असतात. बऱ्याच कंपन्या या चांगले फायदे देत असतात.

26
कोणत्या मॉडेलवर किती नफा मिळणार?

देशातील सर्वात जास्त विक्री होणारी विक्री म्हणून एमजी विंडसर गाडीची केली जाणार आहे. या गाडीवर जवळपास ५०,००० रुपयांपर्यंत ऑफर मिळणार आहे. एमडी विंडसर ईव्हीची सध्याची एक्स-शोरूम किंमत 12.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 18.39 लाख रुपयांपर्यंत जाते.

36
किती मिळणार फायदा?

एमजी अॅस्टर या गाडीवर ५०,००० रुपयांपर्यंत ग्राहकांना मिळणार आहे. एमजी अॅस्टरची सध्याची एक्स-शोरूम किंमत 9.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 16.24 लाख रुपयांपर्यंत जाते.

46
एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लसवर ९०,००० रुपयांपर्यंत फायदा मिळणार फायदा

जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेक्टर आणि हेक्टर प्लसवर ९०,००० रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. हेक्टरची किंमत १४ लाख रुपयांपासून सुरु असून २०.७६ लाख शेवटची किंमत आहे. त्याच वेळी, हेक्टर प्लसची एक्स-शोरूम किंमत 16.05 लाख रुपयांपासून 22.75 लाख रुपयांपर्यंत आहे.

56
एमजी कॉमेट एक लाख रुपयांपर्यंत मिळणार सूट

भारतात विकली जाणारी भारतात विकली जाणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट ईव्हीवर ग्राहकांना या महिन्यात एक लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. एमजी कॉमेट ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 7.50 लाख ते 9.56 लाख रुपयांपर्यंत आहे.

66
एमजी ग्लॉस्टरपेक्षा सर्वात मोठा फायदा

एमजी ग्लॉस्टर गाडीवर या महिन्यात ४ लाख रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे. एमजी ग्लॉस्टरची एक्स-शोरूम किंमत 38.33 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 43.16 लाख रुपयांपर्यंत जाते.

Read more Photos on

Recommended Stories