मारुती ग्रँड व्हिटारा गाडी आधुनिक हायब्रीड तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन आणि अपडेटेड सुरक्षा प्रणालीमुळे बाजारात चर्चेत आहे. या गाडीत १.५ लिटर इंजिन, प्रीमियम इंटेरिअर आणि उत्तम मायलेज देण्यात आले आहे, ज्यामुळे ती ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.
Maruti Grand Vitara: मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार मोठा डिस्काउंट, फीचर्स घ्या जाणून
मारुती ग्रँड व्हिटारा गाडीने मार्केटमध्ये चर्चा निर्माण केली आहे. या गाडीचे आधुनिक हायब्रीड तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन आणि अपडेटेड सेक्युरिटी प्रणालीमुळं हे वाहन अपडेट केलं आहे.
26
फीचर्समध्ये काय केलं अपडेट?
दमदार इंजिन या गाडीमध्ये देण्यात आलं असून ग्रँड व्हिटारा गाडीमध्ये १.५ लिटर इंजिन देण्यात आलं आहे. माइल्ड हायब्रीड प्रकारात पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक सहाय्यक प्रणाली जोडलेली असून ती इंधनाची कार्यक्षमता वाढवते.
36
गाडीच्या इंटेरिअरवर देण्यात आलं लक्ष
या गाडीमध्ये इंटेरिअरवर काळजीपूर्वक लक्ष देण्यात आल आहे. डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आणि अडव्हान्स एयर कंडीशनिंग सिस्टममुळे गाडी अधिक आरामदायक बनते. प्रीमियम फिनिशिंग आणि दर्जेदार मटेरियल वापरल्यामुळे या एसयूव्हीमध्ये लांबचा प्रवासही आरामदायी होतो.
आधुनिक फीचर्सने गाडी अपडेट केली जाणार आहे. यात अनेक एयरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल-होल्ड असिस्ट आहे.
56
इंधन कार्यक्षमता क्वालिटी
या एसयूव्हीची इंधन कार्यक्षमता क्वालिटी देण्यात आली आहे. स्ट्रॉंग हायब्रीड व्हेरियंटमध्ये ही गाडी उत्तम मायलेज देते. यामुळे सध्याच्या इंधनाच्या वाढत्या किमतीच्या काळात ग्राहकांना हे मॉडेल अधिक आकर्षित करत आहे.
66
गाडीची किती आहे किंमत?
या गाडीची किंमत एक्स-शोरूम किंमत सुमारे 10.70 लाख ते 11.40 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-एंड हायब्रीड किंवा प्रीमियम व्हेरियंटची किंमत सुमारे 19.50 लाख ते 20.00 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.