मारुती सुझुकीची ही गाडी देणार ३० kmpl चा मायलेज, विक्रीत राहिली क्रमांक एकवर

Published : Dec 16, 2025, 11:27 AM IST

मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ही एक लोकप्रिय मिड-साईज एसयूव्ही म्हणून उदयास आली आहे, जिने विक्रीत प्रतिस्पर्धकांना मागे टाकले आहे. ही गाडी उत्कृष्ट मायलेज (२८.६५ किमी/लिटर पर्यंत), पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS सारखी अत्याधुनिक फीचर्स देते.

PREV
17
मारुती सुझुकीची हि गाडी देणार ३० kmpl च मायलेज, विक्रीत राहिली क्रमांक एकवर

भारतात सध्याच्या काळात मिड साईज एसयूव्हीला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. या गाडीच्या वाढत्या मागण्यांमुळे त्यांची खरेदी करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मारुती सुझुकीने विकटोरीस हि गाडी मार्केटमध्ये आणली.

27
गाडी ठरली लोकप्रिय

हि गाडी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या गाडीची जवळपास १२,३०० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. हायब्रिड विभागातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली.

37
Victoris गाडीचे काय आहेत स्पेसिफिकेशन

उत्कृष्ट मायलेज, विश्वासार्ह तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीसह, व्हिक्टोरिसने Maruti Grand Vitara आणि Toyota Hyryder सारख्या लोकप्रिय एसयूव्हींना मागे टाकले आहे.

47
गाडीची किती आहे किंमत?

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 19.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

57
ड्रायव्हिंगचा देते चांगला अनुभव

व्हीकटोरीसमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन आहे ज्यामध्ये माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे, जी 102 बीएचपी निर्माण करते. मजबूत हायब्रीड आणि सीएनजी पर्याय देखील उपलब्ध होणार आहेत. ही एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

67
मायलेज देते दमदार

Maruti Victoris ही आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही मानली जाते. पेट्रोल व्हेरिएट हि कार सुमारे २१ किमी प्रति लिटर ऍव्हरेज देत असते. हायब्रिड व्हेरिएंटमध्ये कंपनीकडून तब्बल 28.65 किमी प्रति लिटर मायलेजचा दावा करण्यात आला आहे.

77
गाडीत मिळणार बेस्ट फिचर

गाडीत कंपनीकडून बेस्ट फिचर देण्यात येणार आहेत. यामध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 360 डिग्री कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS टेक्नॉलॉजीचा समावेश आहे.

Read more Photos on

Recommended Stories