Maruti Suzuki : पूर्णपणे भारतात बनवलेली ही कार, तिच्या 1.5-लीटर इंजिन आणि ऑल-ग्रिप प्रो 4WD टेक्नॉलॉजीमुळे 100 पेक्षा जास्त देशांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
मारुती सुझुकीनुसार, जिम्नी 5-डोर एसयूव्हीची जागतिक निर्यात 1 लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. 2023 मध्ये भारतात लाँच झाल्यानंतर लगेचच ही एसयूव्ही 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात होऊ लागली.
25
100 हून अधिक देशांमध्ये निर्यात ( Maruti Suzuki Jimny )
ही 5-डोर जिम्नी पूर्णपणे भारतात तयार केली जाते. ही मारुतीच्या इतिहासातील दुसरी सर्वाधिक निर्यात होणारी कार आहे. जिम्नी आता जगभरातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
35
महत्त्वाची तांत्रिक वैशिष्ट्ये ( Maruti Suzuki Jimny )
जिम्नी 5-डोरची रचना थ्री-डोर मॉडेलसारखीच आहे. यात लॅडर फ्रेम चेसिस, ऑल-ग्रिप प्रो 4WD तंत्रज्ञानासह 1.5-लीटर इंजिन आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध आहेत.
फायदे आणि प्रवासाची क्षमता ( Maruti Suzuki Jimny )
जिम्नीचा जास्त ग्राउंड क्लिअरन्स डोंगराळ रस्त्यांवर आणि हायवेवर चालवण्यासाठी उत्तम आहे. 90-110 किमी/तास वेगाने लांबचा प्रवासही करता येतो. एसी आणि हीटरमुळे प्रवास अधिक आरामदायक होतो.
55
मारुती सुझुकी ( Maruti Suzuki Jimny )
टर्बो इंजिन असलेल्या एसयूव्हीप्रमाणे ही जास्त वेग हाताळू शकत नाही. बॉटल होल्डर्स, स्टोरेज स्पेसची कमतरता हे तोटे आहेत. पण जगभरातील ग्राहकांच्या विश्वामुळे जिम्नी एक मोठे यश आहे.