Published : Oct 26, 2025, 07:41 PM ISTUpdated : Oct 28, 2025, 07:57 AM IST
Maruti Suzuki Ignis : मारुती सुझुकी आपली प्रीमियम हॅचबॅक इग्निस मोठ्या डिस्काउंटसह देत आहे. इग्निस तिच्या खास डिझाइन, कॉम्पॅक्ट आकार आणि दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. जाणून घ्या तिची किंमत किती कमी झाली आहे.
मारुती सुझुकीने GST बदलांनंतर प्रीमियम हॅचबॅक इग्निसची किंमत कमी केली आहे. ग्राहकांना GST चा फायदा दिला जात आहे. आता कार खरेदीवर सुमारे ₹69,000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे ही कार खरेदी करणे सोपे झाले आहे. शिवाय या कारचा लुकही आकर्षक आहे.
25
मारुती इग्निसची नवीन किंमत किती?
इग्निसच्या बेस मॉडेलची किंमत ₹5.35 लाख झाली आहे, तर टॉप मॉडेलची किंमत ₹7.43 लाख झाली आहे. या कपातीमुळे, SUV सारखी दिसणारी ही कार शहरी ग्राहकांसाठी अधिक आकर्षक झाली आहे. महिलांसाठीही ही कार उत्तम आहे. वर्किंग क्लास महिला या कारने ऑफिसला जाऊ शकतात. ही कार चालवायलाही सोपी आहे.
35
मारुती इग्निसचे खास फीचर्स
इग्निस स्पोर्टी डिझाइन, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि SUV सारख्या लुकसाठी ओळखली जाते. यात टचस्क्रीन, ऑटो क्लायमेट कंट्रोल, LED हेडलाइट्स आणि ड्युअल एअरबॅग्ज सारखे फीचर्स आहेत. आधुनिक जवळपास सर्व फिचर या कारमध्ये आहेत. त्यामुळे ती ग्राहकांची पसंती ठरत आहे.
मारुती इग्निसमध्ये 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे, जे 83 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. एएमटीमुळे शहराच्या ट्राफिकमध्येही वारंवार गिअर बदलण्याची गरज भासत नाही.
55
मारुती इग्निसचे मायलेज किती?
कंपनीच्या दाव्यानुसार, इग्निस सुमारे 20.89 किमी/लीटर मायलेज देते. त्यामुळे शहरी आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी ही कार ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे. त्यामुळे ही एक कॉस्ट इफेक्टिव्ह कारही आहे. एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार म्हणूनही तिच्याकडे बघितले जाते.