Tata Tiago vs Maruti Wagon R कोणती कार आहे बेस्ट? GST कमी झाल्यावर किंमत किती?

Published : Oct 27, 2025, 04:09 PM ISTUpdated : Oct 28, 2025, 07:48 AM IST

Tata Tiago vs Maruti Wagon R : नवीन GST नियमांमुळे टॅक्स कमी झाला आहे, त्यामुळे टाटा टियागो आणि मारुती वॅगन आर या दोन्ही गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. या सणासुदीच्या काळात या दोन गाड्यांपैकी कोणती गाडी स्वस्त आहे, हे जाणून घ्या.

PREV
14
टाटा टियागो विरुद्ध मारुती वॅगन आर ( Tata Tiago vs Maruti Wagon R )

GST 2.0 चे नवीन नियम 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत. यामुळे कारवरील टॅक्स 28% वरून 18% पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे अनेक लहान गाड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. या कारना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार कमी किमतीला मिळत असल्याने सणासुदीला त्यांची विक्री वाढली आहे. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातही खप चांगला असल्याचे निरिक्षण डिलर्सनी नोंदवले आहे.

24
मारुती वॅगन आरची किंमत ( Tata Tiago vs Maruti Wagon R )

मारुतीने GST कपातीनंतर वॅगनआरची किंमत कमी करून ₹4.98 लाख केली आहे. तर टाटा मोटर्सने टियागोची किंमत ₹75,000 ने कमी केली आहे. त्यामुळे टियागोची सुरुवातीची किंमत ₹4.57 लाख आहे. या दोन्ही कार ५ लाखांच्या आत उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यात पहिल्यांदा कार घेणार्यांची संख्या जास्त आहे.

34
टियागोची खास वैशिष्ट्ये ( Tata Tiago vs Maruti Wagon R )

टियागो CNG मॉडेलमध्ये 75.5 PS पॉवर आणि 96.5 Nm टॉर्क आहे. यात 242 लीटर बूट स्पेस आणि 170 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. वॅगनआरमध्ये 1.0L आणि 1.2L पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. सीएनजीमुळे कारचा मायलेज वाढला आहे. त्यामुळे पैशांची बचत होत आहे. तर पेट्रोलमुळे इंजिनाची क्षमता वाढली आहे.

44
किंमत आणि मायलेज ( Tata Tiago vs Maruti Wagon R )

एकंदरीत, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत टाटा टियागो थोडी स्वस्त आहे, पण सोपी देखभाल आणि विश्वासार्हतेमुळे वॅगनआरला अधिक पसंती दिली जाते. GST कपात ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे. या दोन्ही कार छोटी फॅमिली कार म्हणून पुढे आल्या आहेत. 

Read more Photos on

Recommended Stories