
Mahindra XEV 9S 7 Seater Electric SUV : नवी महिंद्रा XEV 9S इलेक्ट्रिक एसयूव्ही 27 नोव्हेंबर 2025 रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. ही XEV 9e ची 7-सीटर आवृत्ती आहे, जी पूर्वी महिंद्रा XEV 7e म्हणून ओळखली जात होती. XEV 9e आणि BE 6 प्रमाणेच, ही नवीन महिंद्रा 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही इंग्लो स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही गाडी BYD Atto 3 आणि टाटा हॅरियर EV यांच्याशी स्पर्धा करेल. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 21 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. गाडीबद्दल अधिक तपशील येत्या आठवड्यात अधिकृतपणे जाहीर केला जाईल. या गाडीबद्दल आतापर्यंत मिळालेली माहिती येथे आहे. या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभणार असल्याचे दिसून येत आहे. या कारचे आकर्षक डिझाईन आणि आता ती ७ सिटर आवृत्तीत येणार असल्याने आतुरतेने प्रतिक्षा करण्यात येत आहे.
नवीन महिंद्रा 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e सोबत पॉवरट्रेन शेअर करण्याची शक्यता आहे. ही सध्या 59kWh आणि 79kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. लहान बॅटरी पॅक 307bhp इलेक्ट्रिक मोटरसह येतो, जो 435 किमी रेंज देतो. तर, मोठा बॅटरी पॅक 378bhp मोटरसह उपलब्ध आहे आणि 540 किमी रेंज देतो. नवीन XEV 9S ची रेंज एका चार्जमध्ये 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.
XEV 9S मध्ये तिसऱ्या रांगेतील सीटचा समावेश असेल, तर तिचे केबिन लेआउट आणि वैशिष्ट्ये XEV 9e प्रमाणेच असतील. यातील काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ट्रिपल स्क्रीन, प्रकाशित लोगोसह 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेशनसह पॉवर्ड फ्रंट सीट्स, मल्टी-कलर ॲम्बियंट लायटिंग, एकापेक्षा जास्त वायरलेस फोन चार्जर, हेड-अप डिस्प्ले, 16 स्पीकर्ससह हर्मन/कार्डन साउंड सिस्टीम, पुश-बटण स्टार्टसह कीलेस एंट्री, 7 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, EBD सह ABS, पुढील आणि मागील पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-2 ADAS सारखी वैशिष्ट्ये मिळतात.
नवीन महिंद्रा 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्हीचा सिल्हाऊट (silhoutte) XUV700 सारखा असेल, तर तिची डिझाइन लँग्वेज XEV 9e सारखी असेल. समोरच्या बाजूला, नवीन XEV 9S मध्ये ब्लँक्ड-ऑफ ग्रिल, त्रिकोणी आकाराचे एलईडी हेडलॅम्प आणि पूर्ण-रुंदीची एलईडी स्ट्रिप असेल. एसयूव्हीमध्ये नवीन एअरो-ऑप्टिमाइझ केलेले अलॉय व्हील, व्हील आर्च क्लॅडिंग, फ्लश डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेललॅम्प आणि नवीन डिझाइनचा मागील बंपर देखील असेल.