बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून मोफत १० वस्तूंचा ‘Essential Kit’, असा करा ऑनलाईन अर्ज

Published : Nov 04, 2025, 03:40 PM IST

महाराष्ट्र सरकारने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत Essential Kit योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, कामगारांना वॉटर प्युरिफायरसह १० आवश्यक घरगुती वस्तूंचा संच दिला जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती येथे दिली आहे.

PREV
16
बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी!

Maharashtra Construction Workers Essential Kit Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक उपयुक्त आणि दिलासादायक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र कामगारांना घरगुती वापरासाठी लागणाऱ्या १० आवश्यक वस्तूंचा भांडी संच (Essential Kit) पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे.

या योजनेमुळे कामगार कुटुंबांना घरासाठी लागणाऱ्या अनेक आवश्यक वस्तू एकाच संचात उपलब्ध होणार असून, आर्थिक दिलासा आणि सन्मानजनक जीवनशैलीसाठी ही योजना मोठी मदत ठरणार आहे. 

26
मोफत मिळणाऱ्या १० वस्तूंची यादी

या Essential Kit मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.

पत्र्याची पेटी

प्लास्टिक स्टूल

धान्य ठेवण्याची कोठी

किलो क्षमतेचा धान्य डब्बा

बेडशीट (चादर)

ब्लँकेट (कांबळे)

साखर ठेवण्यासाठी डब्बा

चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा

दुसरी चादर (बेडशीटपेक्षा वेगळी)

१८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर (पाणी शुद्धीकरण यंत्र) 

36
अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

१: BOCW नोंदणी क्रमांक मिळवा

Google वर “Maha BOCW Profile Login” असे शोधा.

पहिल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.

मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा.

लॉगिन झाल्यावर तुमचा BOCW Registration Number दिसेल, तो जतन करा.

46
२: Essential Kit साठी ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळावर जा.

तुमचा BOCW Registration Number आणि मोबाईल क्रमांक टाका.

OTP टाकून ‘Verify OTP’ करा.

तुमची माहिती दिसल्यावर तुमच्या जिल्ह्यातील शिबिर (Camp) निवडा.

उपलब्ध तारखांपैकी Appointment Date निवडा.

‘Print Appointment’ क्लिक करून पावती डाउनलोड करा किंवा प्रिंट घ्या.

56
३: शिबिरात जाऊन संच मिळवा

ठरलेल्या दिवशी, दिलेल्या शिबिर स्थळी वेळेत पोहोचा.

आधार कार्ड आणि अपॉइंटमेंट पावती सोबत ठेवा.

तिथे तुम्हाला १० वस्तूंचा Essential Kit संच मोफत दिला जाईल.

66
महत्त्वाची सूचना

अपॉइंटमेंट स्लॉट भरले असल्यास, १५ दिवसांनंतर पुन्हा प्रयत्न करा.

केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

पात्रतेची अट पूर्ण न केल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो.

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ही योजना म्हणजे एक आर्थिक आधार आणि घरगुती स्थैर्याचा नवा टप्पा आहे. मोफत Essential Kit मुळे कामगारांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मोठी मदत मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories