Honda Livo 2025 : 110cc सेगमेंटमध्ये हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिनासारख्या बाईक्सना टक्कर देण्यासाठी होंडा लिवो 2025 बाजारात आली आहे. स्टायलिश डिझाइन, उत्तम मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेल्या या बाईकची माहिती खास तुमच्यासाठी.
* ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत ₹77,492 (एक्स-शोरूम)
* डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत ₹80,059 (एक्स-शोरूम)
शहर आणि राज्याच्या टॅक्सनुसार ऑन-रोड किंमत बदलू शकते. कमी बजेटमध्ये बाईक शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
24
इंजिन आणि परफॉर्मन्स
होंडा लिवो 2025 मध्ये 109.51cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे BS6 फेज 2B आणि OBD-2D नियमांनुसार बनवले आहे. इंजिन 8.7 bhp पॉवर आणि 9.3 Nm टॉर्क देते. 4-स्पीड गिअरबॉक्समुळे रायडिंगचा अनुभव स्मूथ मिळतो. सायलेंट स्टार्ट ACG मोटरमुळे इंजिनचे व्हायब्रेशन कमी होते.
34
जबरदस्त मायलेज
होंडा लिवो 2025 रस्त्यावर 60-65 किमी प्रति लिटर मायलेज देते. ARAI सर्टिफाइड मायलेज 60 किमी/लिटर आहे. 9-लिटरच्या टाकीमुळे एकदा टाकी फुल्ल केल्यावर 600 किमी पेक्षा जास्त प्रवास करता येतो. eSP टेक्नॉलॉजीमुळे इंधन वाचते आणि लांबच्या प्रवासात चांगला परफॉर्मन्स मिळतो.