Voting स्लिप घरी न आल्यास घरबसल्या करता येईल डाउनलोड, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

Published : May 06, 2024, 02:37 PM ISTUpdated : May 06, 2024, 02:39 PM IST
Voting Card

सार

Voter Slip : लोकसभा निवडणुकीसाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप रपतात. पण काहीजणांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही वोटर स्लिप डाउनलोड करू शकता.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. यावेळी 97 जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप करत आहेत. जेणेकरून नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. पण काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच तुम्ही ऑनलाइन किंवा एका एसएमएसच्या माध्यमातूनही वोटर स्लिप मिळवू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

वोटर स्लिपशिवायही करता येईल मतदान

वोटर स्लिप नसल्यास तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. वोटर स्लिप मिळवण्यासाठी मतदार मदत केंद्राला भेट देऊन ती मिळवू शकता.

वोटर स्लिप अशी करा डाउनलोड

  • सर्वप्रथम फोनच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन तेथे वोटर हेल्पलाइन अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आता मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड भरून लॉगइन करा.
  • नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर रजिस्टर करा.
  • EPIC क्रमांक सर्च केल्यानंतर वोटर स्लिप दाखवली जाईल ती डाउनलोड करा.

SMS च्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती

मोबाइलमध्ये टेक्स मेसेजमध्ये ECI स्पेस मतदान कार्डवरील कार्ड क्रमांक लिहून 1950 वर मेसेज पाठवा. केवळ 14 सेकेंदामध्ये मतदान केंद्राची माहिती तुम्हाला मिळेल.

वोटर स्लिपशिवाय कसे मतदान करू शकतो?

मतदार यादीत नाव नसल्यास आणि वोटर स्लिपही नसेल तरीही तुम्ही मतदान कार्डच्या माध्यमातून मतदान करू शकता. निवडणूक आयोगाने 12 ओखळपत्रांच्या माध्यमातून मतदान करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना अशा काही ओखळपत्रांचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

लग्नानंतर आधार कार्डवरील पत्नीचे आडनाव बदलायचेय? जाणून घ्या प्रक्रिया

EPFO देणार 50 हजार रुपयांचा बोनस, केवळ 'ही' अटक पूर्ण करावी लागणार

PREV

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार