भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये ह्युंदाई क्रेटाने १८,३८१ युनिट्सच्या विक्रीसह नवा विक्रम रचला आहे. या विक्रीमुळे क्रेटाने मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर आणि किया सेल्टॉस यांसारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांना मागे टाकले आहे.
सर्वात जास्त 'या' SUVची झाली विक्री, विक्रीचे आकडे पाहून पायाला येतील मुंग्या
भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही प्रकारात क्रेटा या गाडीचा दबदबा अजूनही चांगला सुरु आहे. क्रेटाच्या आसपास कोणत्याच गाडीचं मार्केट नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा..
26
क्रेटाच्या गाड्यांची किती झाली विक्री?
क्रेटाच्या गाड्यांची १८,३८१ विक्री झाली असून त्यांनी इतिहास रचला आहे. या सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांच्या गाड्यांची चांगली विक्री झाली असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
36
कोणत्या गाड्या सेगमेंटमध्ये आहेत?
मारुती विकटोरीस टोयोटो हायराइडर, मारुती ग्रँड हारायडर, किया सेलटॉस आणि टाटा कर्व्ह या गाड्यांचा यामध्ये समावेश होतो. आपण या सीरिजमधील बेस्ट गाडी कोणती ते जाणून घेऊयात.
क्रेटा गाड्यांची जवळपास १८,३८१ गाड्यांची विक्री झाली आहे. त्यानंतर सुझुकी कंपनीची १३, ४९६ गाड्यांची विकटोरीस गाड्यांची विक्री झाली आहे. हायराइडर गाडीच्या जवळपास ११, ५५५ युनिट्सची विक्री झाली आहे.
56
किया सेलटॉसची झाली चांगली विक्री
किया सेलटॉसची विक्री चांगली विक्री झाली असून गाडीची जवळपास ७, १३० युनिट्सची विक्री झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये ६३६५ गाड्यांच्या युनिट्सची विक्री झाली आहे.
66
टाटा कर्व्ह गाड्यांची झाली विक्री
टाटा कर्व्ह गाड्यांची विक्री १, ४३२ गाड्यांच्या युनिट्सची विक्री झाली. ऑक्टोबर २०२४ मध्ये या कंपनीच्या मॉडेलची ५, ३५१ युनिट्सची विक्री झाली आहे. स्कोडा कुशाक कंपनीच्या गाड्यांची १,२१९ गाड्यांची विक्री झाली आहे.