Japanese Manicure तुम्हालाही नेल पॉलिश न लावता तुमची नखं चमकदार आणि हेल्दी ठेवायची असतील, तर तुम्ही जपानी मॅनिक्युअर नक्की ट्राय करू शकता. हे मॅनिक्युअर नखांना आतून पोषण देतं आणि बाहेरून सुंदर बनवतं.
आजकाल सोशल मीडियावर जपानी मॅनिक्युअर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा नेल ट्रेंड विशेषतः अशा लोकांना आवडतोय, ज्यांना नेल पॉलिशशिवाय चमकदार आणि हेल्दी नखं हवी आहेत. जपानी मॅनिक्युअर केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर नखांना आतून पोषण देऊन मजबूत करण्यासाठी केलं जातं.
25
काय आहे जपानी मॅनिक्युअर?
जपानी मॅनिक्युअरला 'पी-शाइन' (P-Shine) किंवा 'नॅचरल नेल ग्लो' असंही म्हणतात. हे एक पारंपरिक जपानी ब्यूटी टेक्निक आहे. यात नेल पॉलिश न लावता नखांना नैसर्गिकरित्या चमक दिली जाते. सामान्य मॅनिक्युअरमध्ये जिथे नेल आर्ट आणि डिझाइनवर लक्ष दिलं जातं, तिथे जपानी मॅनिक्युअर नखांना हेल्दी आणि मजबूत बनवण्यावर लक्ष केंद्रित करतं.
35
जपानी मॅनिक्युअरमध्ये वापरले जाणारे मुख्य घटक
जपानी मॅनिक्युअरमध्ये मधमाशीचं मेण (Beeswax) वापरतात, जे नखांमध्ये ओलावा टिकवून ठेवतं आणि एक संरक्षक थर तयार करतं. केराटिनमुळे कमकुवत आणि तुटलेली नखं मजबूत होतात. सिलिका नखांची मजबुती आणि रचना सुधारते. तर समुद्री मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स नखांना पोषण देऊन हेल्दी बनवतात. ही प्रक्रिया केल्यानंतर नखं अधिक चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.