Jasmin Growing Tips: उन्हाळ्यात चमेली म्हणजेच जास्मिनच्या फुलांचा सुगंध संपूर्ण घर आणि बाल्कनीमध्ये दरवळतो. तुम्हालाही पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरलेलं चमेलीचं रोपटं हवं असेल, तर या सोप्या गार्डनिंग टिप्स नक्की वाचा.
सुरुवातीला चमेलीच्या रोपाची मुळं मजबूत करणं गरजेचं आहे. यासाठी, रोपाच्या मुळांजवळ थोडं शेणखत किंवा वर्मीकंपोस्ट टाका. त्यानंतर थोडं पाणी द्या. यामुळे रोपाला आवश्यक पोषण मिळतं आणि त्याची वाढ वेगाने होते. दुसऱ्या आठवड्यात रोपाला फक्त पाणी द्या, इतर काहीही टाकू नका.
24
तिसऱ्या आठवड्यात केळ्याच्या सालीचं खत वापरा
चमेलीला जास्त आणि मोठी फुलं येण्यासाठी केळ्याच्या सालीचं खत खूप फायदेशीर ठरतं. केळ्याच्या सालींमध्ये पोटॅश आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं, जे फुलांची संख्या वाढवण्यास मदत करतं. तुम्ही साली वाळवून त्याची पावडर बनवू शकता किंवा पाण्यात मिसळून लिक्विड खत म्हणून वापरू शकता.
34
चौथ्या आठवड्यात सीवीड लिक्विडचा वापर करा
चौथ्या आठवड्यात रोपाची वाढ आणि फुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सीवीड लिक्विड फर्टिलायझर वापरा. १ लिटर पाण्यात ५ मिली सीवीड लिक्विड मिसळून रोपाला द्या. यामुळे रोपटं मजबूत होतं आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
जेव्हा चमेलीला फुलं येऊ लागतील, तेव्हा सुकलेली आणि कोमेजलेली फुलं वेळोवेळी काढत राहा. यामुळे रोपाला नवीन कळ्या फुटतात आणि जास्त काळ फुलं येत राहतात. चमेलीचं रोपटं चांगल्या उन्हात वेगाने वाढतं. त्याला रोज किमान ५-६ तास ऊन मिळायला हवं. हवामान बदलल्यावर हलकी छाटणी (प्रूनिंग) करा. किडींपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची फवारणी (नीम ऑइल स्प्रे) देखील करू शकता.