IPPB Bank Recruitment 2025: इंडिया पोस्ट बँकेत भरती! ग्रॅज्युएट तरुणांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा

Published : Oct 11, 2025, 06:34 PM IST

IPPB Bank Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ३४८ जागांची भरती जाहीर केली आहे. २० ते ३५ वयोगटातील कोणत्याही शाखेचे पदवीधर २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. 

PREV
15
ग्रॅज्युएट तरुणांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी एक आनंदाची संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 348 जागांवर भरती जाहीर केली असून, 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

जर तुमचं पदवी शिक्षण पूर्ण झालं असेल आणि वय 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल, तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. 

25
भरतीची ठळक वैशिष्ट्यं

एकूण जागा: 348

पद: एक्झिक्युटिव्ह (Executive)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून)

वय मर्यादा: 20 ते 35 वर्षे (1 ऑगस्ट 2025 रोजी गणना)

निवड प्रक्रिया: शैक्षणिक गुणांवर आधारित निवड (आवश्यक असल्यास CBT परीक्षा)

पगार: मासिक ₹30,000

नियुक्ती स्थान: भारतातील विविध राज्यांमध्ये 

35
अर्ज कसा कराल?

अर्ज सुरु होण्याची तारीख: 9 ऑक्टोबर 2025

शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाइट: ippbonline.com

अर्ज करण्याआधी अधिकृत भरती जाहिरात PDF नीट वाचावी. त्याची लिंक आणि अर्ज लिंक या बातमीत दिल्या आहेत. 

45
अर्ज करण्याआधी हे लक्षात ठेवा

वयाची अचूक गणना करा, वयोमर्यादेमध्ये कोणतीही सवलत नाही.

पदवी कोणत्याही शाखेची चालते, मुक्त विद्यापीठाची पदवीही ग्राह्य धरली जाईल.

निवड शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे होणार असल्याने मार्कशीटची तयारी ठेवा.

ज्या राज्यात नियुक्ती होईल, त्या भागात काम करण्याची तयारी असावी. 

55
ही संधी का खास आहे?

थेट भारत सरकारच्या पोस्ट विभागात नोकरी

नियमित पगार आणि शाश्वत नोकरीचा फायदा

कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र

CBT आवश्यक असल्यास, पण बहुतेक निवड मेरिटवर

अर्ज करण्यासाठी घाई करा, शेवटची तारीख 29 ऑक्टोबर!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories