Finance Tips : सणासुदीच्या काळात पर्सनल लोन घ्यायचं आहे, पण तुमचा क्रेडिट स्कोर 600 पेक्षा कमी आहे? काळजी करू नका. योग्य नियोजन आणि विश्वासार्ह कर्जदार निवडून तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. जाणून घ्या यासाठी काय करावं लागेल...
600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोरवर कर्ज मिळणे का अवघड असते?
बँका आणि NBFCs (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या) तुमचा क्रेडिट स्कोर, परतफेडीचा इतिहास आणि आर्थिक वर्तन पाहून ठरवतात की तुम्ही कर्जासाठी विश्वासार्ह आहात की नाही. जर स्कोर 600 पेक्षा कमी असेल, तर कर्जदाराला वाटतं की कर्ज परत न मिळण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे ते एकतर कर्ज नाकारतात किंवा जास्त व्याजदर, कमी कर्जाची रक्कम आणि कठोर अटींसह मंजुरी देतात.
25
कमी क्रेडिट स्कोरवर लोन अप्रूव्हलची शक्यता कशी वाढवावी?
सिक्योर्ड लोन निवडा: जर तुम्ही तारण (उदा. मालमत्ता, सोनं किंवा फिक्स्ड डिपॉझिट) ठेवून कर्ज घेत असाल, तर मंजुरीची शक्यता वाढते.
सह-अर्जदार किंवा जामीनदार जोडा: चांगला क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तीला सोबत घ्या. यामुळे कर्जदाराचा विश्वास वाढेल.
सॅलरी स्लिप आणि उत्पन्नाचा पुरावा तयार ठेवा: नियमित उत्पन्न दाखवल्यास बँकेला खात्री पटते की तुम्ही वेळेवर EMI भरू शकाल.
लहान कर्जाची रक्कम आणि कमी कालावधी निवडा: कमी रक्कम आणि कमी मुदतीचं कर्ज घेतल्यास लवकर मंजुरी मिळते आणि व्याजही कमी लागतं.
35
पर्सनल लोन कुठून घ्यावे?
तज्ज्ञांच्या मते, नेहमी RBI कडे नोंदणीकृत असलेल्या कर्जदाराकडूनच कर्ज घ्या. यामुळे पारदर्शकता राहते आणि सुरक्षाही मिळते. रिझर्व्ह बँकेनुसार, सुमारे 1,600 डिजिटल लेंडिंग ॲप्स रेग्युलेटेड आहेत. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे कर्ज 24 महिन्यांसाठी घेतले, तर साधारणपणे प्रोसेसिंग फी 0.5-4% आणि 18% GST, व्याजदर 14%-24% वार्षिक असतो, ज्याचा EMI 4,800-5,300 रुपयांच्या दरम्यान येतो. लेट पेमेंट दंड थकबाकीवर 1-2% मासिक लागतो.
कोणत्याही EMI बाबत अडचण आल्यास कस्टमर केअरचा सल्ला घ्या.
थोड्या सावधगिरीने आणि योग्य आर्थिक सवयींनी 600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोरवरही पर्सनल लोन मिळवून ते चांगल्याप्रकारे मॅनेज करू शकता.
(डिस्क्लेमर: या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य जागरूकतेच्या उद्देशाने आहे. हा कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला (Financial Advice) नाही. कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून किंवा बँक प्रतिनिधीकडून संपूर्ण माहिती नक्की घ्या. कर्जाच्या अटी, व्याजदर आणि शुल्क वेगवेगळ्या बँका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांनुसार बदलू शकतात.)