iPhone 17e launch weeks away one feature may disappoint you : ॲपल आपला पुढचा बजेट-फ्रेंडली आयफोन, iPhone 17e, परवडणाऱ्या किमतीत लाँच करेल अशी अपेक्षा आहे. मात्र यातील एक फिचर तुम्हाला निराश करु शकतं. जाणून घ्या त्या बद्दल.
iPhone 17e हा ॲपलचा पुढचा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन आहे. पण एक बातमी आयफोनप्रेमींना निराश करणारी आहे. लीक्सनुसार, याचा डिस्प्ले 120Hz प्रोमोशन टेक्नॉलॉजीवर अपग्रेड केला जाणार नाही.
25
आयफोन 17e लवकरच लाँच होणार
एका चायनीज टिपस्टरने दावा केला आहे की, ॲपल या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत iPhone 17e लाँच करेल. रिपोर्ट्सनुसार, हा फोन फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच होणाऱ्या iPhone 16e सारखाच असेल.
35
डायनॅमिक आयलँड
रिपोर्टनुसार, iPhone 17e मध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा 6.1-इंचाचा LTPS OLED पॅनल असेल. यात डायनॅमिक आयलँड फीचर आणि ॲपलचा A19 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फेस आयडीचाही समावेश असू शकतो.
iPhone 16e मध्ये A18 चिप आणि कस्टम C1 मॉडेम आहे. यात OIS सह 48MP रियर कॅमेरा, 12MP सेल्फी कॅमेरा आणि IP68-रेटेड बिल्ड आहे. हा फोन 18W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
55
आयफोन 17e लाँचची तारीख
रिपोर्टनुसार, iPhone 17e या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लाँच होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मीडियानुसार, तो फेब्रुवारी अखेरीस सादर होऊन मार्च 2026 च्या सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.