Driving Licence Rules: परदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी वाहन चालवणे आता सोपे झाले आहे, कारण आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (IDP) मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. काही देशांमध्ये भारतीय लायसन्स थेट चालते, तर काहींसाठी IDP आवश्यक असतो.
Indian Driving License International Use: परदेशात राहणाऱ्या किंवा शिक्षण–नोकरीच्या कारणास्तव विदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता भारतातून घेतलेले ड्रायव्हिंग लायसन्स वापरून तुम्हाला परदेशात वाहन चालवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली आहे.
27
पूर्वीची अडचण, आता सोपी प्रक्रिया
अनेक भारतीय नागरिक परदेशात दीर्घकाळ वास्तव्यास असतात. अशावेळी तेथील वाहन चालवण्याची परवानगी मिळवणे ही एक क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया होती. पूर्वी परदेशात गाडी चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (IDP) घेणे अनिवार्य होते. परंतु आता ही प्रक्रिया सुटसुटीत झाली असून भारतातच बसून तुम्ही सहजपणे आंतरराष्ट्रीय परवाना मिळवू शकता, ज्यामुळे अनेक देशांमध्ये कायदेशीररीत्या वाहन चालवणे शक्य होते.
37
भारतीय लायसन्स कुठे चालते?
प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात.
काही देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच पुरेसे असते.
तर काही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (IDP) आवश्यक असते.
म्हणून परदेशात जाण्यापूर्वी त्या देशाचे वाहतूक नियम तपासणे आणि गरज असल्यास आयडीपी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्व कागदपत्रे योग्यरीत्या दिल्यास तुम्हाला एक वर्षासाठी वैध असलेला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स (IDP) सहज मिळू शकतो.
67
आयडीपीचे फायदे
तुमच्या भारतीय लायसन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर मान्यता मिळते
अनेक देशांमध्ये गाडी चालवणे सहज शक्य
कार किंवा इतर वाहन भाड्याने घेणे अधिक सोपे
प्रवासात अडचण कमी आणि अनुभव अधिक सुरक्षित
77
भारताचे ड्रायव्हिंग लायसन्स आता परदेशात वाहन चालवण्यासाठी उपयुक्त ठरणार
भारताचे ड्रायव्हिंग लायसन्स आता परदेशात वाहन चालवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. देशागणिक नियम वेगळे असले तरी आयडीपी मिळवण्याची प्रक्रिया सुकर झाल्याने भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.