Indias Top 5 Most Affordable Electric Cars : कमी किमतीत उत्तम फीचर्ससह उपलब्ध असलेल्या टाटा पंच ईव्ही, एमजी कॉमेट ईव्ही, टाटा टिगोर ईव्ही, नेक्सॉन ईव्ही आणि टियागो ईव्ही या पाच इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊया.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. जर तुम्ही कमी खर्चात, प्रदूषण न करणाऱ्या आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर या आहेत काही खास कार.
26
पंच ईव्ही
पंच ईव्हीमध्ये चार लोकांसाठी पुरेशी जागा आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, सहा एअरबॅग्ज आणि 360-डिग्री कॅमेरा मिळतो. याची किंमत 9.99 लाख ते 14.29 लाख रुपये आहे. यात 25 kWh आणि 35 kWh असे दोन बॅटरी पॅक आहेत. लहान बॅटरी पॅक 315 किमीची रेंज देतो.
36
एमजी कॉमेट ईव्ही
एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. ही सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. यात प्रीमियम केबिन आणि दैनंदिन वापरासाठी अनेक फीचर्स आहेत. 17.3 kWh बॅटरी पॅकसह, ही कार एका चार्जमध्ये 230 किमी धावते, असा ARAI चा दावा आहे. याची किंमत 7.50 लाख ते 9.56 लाख रुपये आहे.
ज्यांना हॅचबॅक किंवा एसयूव्हीऐवजी सेडान आवडतात, त्यांच्यासाठी 15 लाखांपेक्षा कमी किमतीतील टाटा टिगोर ईव्ही हा एकमेव इलेक्ट्रिक पर्याय आहे. याची किंमत 12.49 लाख ते 13.75 लाख रुपये आहे. यात 26 kWh बॅटरी पॅक असून, तो 75 PS आणि 170 Nm टॉर्क निर्माण करतो.
56
टाटा नेक्सॉन ईव्ही
टाटा नेक्सॉन ईव्ही ही भारतातील एक लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. यात 12.3-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सनरूफ आणि 360-डिग्री कॅमेरा असे अनेक फीचर्स आहेत. याची किंमत 12.49 लाख ते 17.49 लाख रुपये आहे.
66
टियागो ईव्ही
ही एक उत्तम 5-डोअर हॅचबॅक असून, यात चार लोकांसाठी चांगली जागा आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन, ऑटो एसी आणि रिव्ह्यू कॅमेरा मिळतो. यात 19.2 kWh आणि 24 kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. याची किंमत 7.99 लाख ते 11.14 लाख रुपये आहे.