Most Expensive Areas India : भारतातील टॉप 5 सर्वात महागडे एरिया, एका बंगल्याची किंमत शेकडो कोटींत

Published : Sep 24, 2026, 04:00 PM IST

भारतातील रिअल इस्टेट मार्केट सध्या वेगाने वाढत आहे. विशेषतः मुंबई, दिल्ली आणि गुरुग्रामसारख्या मेट्रो शहरांमधील काही पॉश आणि व्हीआयपी भागांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

PREV
16
भारतातील रिअल इस्टेटचे रेकॉर्ड्स

देशातील रिअल इस्टेट मार्केट सध्या सुसाट धावत आहे. सामान्य माणसासाठी घर घेणं किती कठीण आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण देशातील टॉपचे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकारणी ज्या भागात राहतात, तिथल्या घरांच्या किमती ऐकून तुमचंही डोकं चक्रावेल. काही भागांमध्ये तर १ स्क्वेअर फुटाचा दर चक्क ₹१ कोटींपर्यंत जातो. देशातील या सर्वात प्रीमियम आणि लक्झरी भागांबद्दल आणि तिथल्या घरांच्या किमतींबद्दल जाणून घेऊया.

26
मलबार हिल, मुंबई

भारतातील सर्वात महागड्या ठिकाणांच्या यादीत मुंबईतील मलबार हिल पहिल्या क्रमांकावर येते. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या या शांत भागात अतिशय प्रीमियम आणि लक्झरी वातावरण पाहायला मिळते.

• खासियत: इथून दिसणारा सी-व्ह्यू, हँगिंग गार्डन्स आणि प्रसिद्ध वाळकेश्वर मंदिर ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. मोठे उद्योगपती, प्रसिद्ध वकील आणि बॉलिवूड स्टार्स इथे राहतात.

• किमती: इथे प्रति स्क्वेअर फुटाचा दर ₹५०,००० ते ₹१,००,००० पेक्षा जास्त आहे. घराच्या आकारानुसार इथल्या प्रॉपर्टीची किंमत ₹५ कोटींपासून सुरू होऊन ₹२० कोटी किंवा त्याहून अधिक असते.

36
अल्टामाउंट रोड, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील अल्टामाउंट रोड हा अब्जाधीशांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. भारतातील टॉप उद्योगपतींची घरे याच रोडवर आहेत.

• खासियत: जुन्या काळातील रॉयल लूक आणि समुद्रासमोर असलेली अतिशय आलिशान घरे यामुळे या लोकेशनची मार्केट व्हॅल्यू खूप वाढली आहे.

• किमती: इथले रिअल इस्टेटचे दर गगनाला भिडले आहेत. प्रति स्क्वेअर फुटाचा दर ₹१ लाख ते ₹२ लाखांपर्यंत आहे. इथे छोट्या आकाराचे घर घ्यायचे असेल तरी किमान ₹२० ते ₹३० कोटी मोजावे लागतात.

46
ल्युटियन्स झोन, नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्लीतील ल्युटियन्स झोन हा सत्ता आणि सर्वोच्च राजकीय ताकदीचा पत्ता आहे. मोठ्या जमिनी आणि रॉयल बंगले या भागाची ओळख आहेत.

• खासियत: मोठ्या आकाराचे लॉन आणि झाडांनी वेढलेले रुंद रस्ते हे इथल्या बंगल्यांचे वैशिष्ट्य आहे. इंडिया गेट, संसद भवन आणि परदेशी दूतावासांच्या अगदी जवळ असलेला हा अतिशय सुरक्षित भाग आहे.

• किमती: ल्युटियन्स झोन किंवा गोल्फ लिंक्स भागात प्रति स्क्वेअर फुटाचा दर ₹१,००,००० ते ₹१,३०,००० पर्यंत असतो. इथल्या एका बंगल्याची किंमत अक्षरशः ₹१०० कोटींच्या पुढे असते.

56
गोल्फ कोर्स रोड, गुरुग्राम

दिल्ली एनसीआरमधील प्राईम लोकेशन्समध्ये गुरुग्रामचा गोल्फ कोर्स रोड दुसऱ्या स्थानावर येतो. बिझनेस हबच्या अगदी जवळ असल्याने आणि आलिशान ऑफिसेसमुळे हा एक लक्झरी कॉरिडॉर बनला आहे.

• खासियत: कॉर्पोरेट दिग्गज आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचे सीईओ इथे राहतात. इथे हाय-राईज अपार्टमेंट्स आणि वर्ल्ड क्लास लाईफस्टाईल मिळते.

• किमती: इथे रेडी-टू-मूव्ह फ्लॅट्ससाठी प्रति स्क्वेअर फूट ₹१८,००० ते ₹२२,००० किंवा त्याहून अधिक मोजावे लागतात. स्वतःचा बंगला किंवा व्हिला घ्यायचा असेल तर किंमत ₹६ कोटींपासून सुरू होऊन ₹२५ कोटींच्या पुढे जाते.

66
पाली हिल, वांद्रे वेस्ट, मुंबई

मुंबईतील वांद्रे भागात असलेले पाली हिल हे सर्वात पॉश ठिकाणांपैकी एक आहे. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे आणि टेक स्टार्टअपचे फाउंडर्स इथे राहण्याला जास्त पसंती देतात.

• खासियत: हिरव्यागार झाडांनी वेढलेले शांत रस्ते, कमी उंचीचे लक्झरी अपार्टमेंट्स आणि इंडिपेंडेंट व्हिला इथे पाहायला मिळतात.

• किमती: इथे प्रति स्क्वेअर फुटाचा दर ₹३५,००० ते ₹१,२०,००० पर्यंत आहे. पाली हिलमध्ये एक चांगले घर घ्यायचे असेल तर जवळपास ₹३० ते ₹४० कोटी खर्च करावे लागतात.

Read more Photos on

Recommended Stories