Indian Railway : प्रवाशाच्या तक्रारीनंतर नियमांत मोठा बदल; रेल्वेला २५,००० दंडही झाला, प्रवाशांना काय फायदा?

Published : Aug 07, 2026, 02:13 PM IST
Indian Railway : प्रवाशाच्या तक्रारीनंतर नियमांत मोठा बदल; रेल्वेला २५,००० दंडही झाला, प्रवाशांना काय फायदा?

सार

Railway Rule : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे बोर्डाने सर्व झोनला यासंबंधी एक सर्क्युलर पाठवून तशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : ट्रेनमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आता RAC अर्थात रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन तिकीट असलेल्या प्रवाशांनाही ब्लँकेट दिलं जाणार आहे. रेल्वे बोर्डाने याबद्दल सर्व झोनला एक सर्क्युलर पाठवलं असून, तशी सोय करण्याचे निर्देश दिले आहेत. एसी चेअर कार वगळता इतर सर्व एसी क्लासमध्ये हा नियम लागू होईल. आतापर्यंत एका सीटसाठी एकच ब्लँकेट दिलं जात होतं. पण RAC मध्ये एकाच सीटवर दोन प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशाच्या तक्रारीनंतर, आता नवा नियम

थर्ड एसीमध्ये ४ लोअर बर्थवर ८ प्रवाशांना आणि सेकंड एसीमध्ये ३ लोअर बर्थवर ६ प्रवाशांना RAC तिकीट दिलं जातं. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने ग्राहक आयोगाकडे तक्रार केली होती. तिकीट काढताना ब्लँकेटचे पैसे घेतले, पण प्रवासात ब्लँकेट मिळालं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. 

रेल्वेला २५ हजारांचा दंड

या तक्रारीनंतर ग्राहक आयोगाने रेल्वेला २५,००० रुपयांचा दंड ठोठावला होता. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा महत्त्वाचा बदल केला आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Mental Health Insurance : थेरपीचा खर्च इन्शुरन्समध्ये कव्हर होतो का? जाणून घ्या
Budget Mileage Bikes : 70 किमी मायलेज, किंमत फक्त 58,850 रुपये; ऑफिससाठी बेस्ट 6 बाईक्स