Retirement Planning : रिटायर्डमेंटनंतर महिन्याला ५० हजार पेन्शन हवंय? जाणून घ्या कुठे आणि किती पैसे गुंतवावे लागतील

Published : Aug 07, 2026, 12:21 PM IST
Saving Tips

सार

Investment Retirement Planning : तुम्हाला जर तुमच्या निवृत्तीनंतर महिन्याला ५० हजार रुपये पेन्शन हवं असेल तर त्यासाठी आधीपासून सेव्हिंग करावं लागेल. जाणून घ्या कसे आणि कुठे पैसे गुंतवावे लागतील?

मुंबई : नोकरी करत असताना दर महिन्याला येणारा पगाराचा मेसेज ही अतिशय दिलासादायक गोष्ट आहे. या मेसेजनंतर प्रत्येकजण आता काय-काय करायचं याचं प्लॅनिंग करतो. घरातील खर्च, ईएमआय, किराण, बिलं अशा सगळ्याच गोष्टी समोर असतात. पण रिटायर्ड झाल्यानंतर पगार येणं बंद होईल, मात्र खर्च असाच राहणार आहे, तो थांबणार नाही. अशावेळी उत्पन्न नसताना रिटायर्डमेंटनंतर कसे पैसे मिळवाल?

जर तुम्हाला रिटायर्डमेंटनंतरही महिन्याला येणारी रक्कम तशीच सुरू ठेवायची असेल, तर यासाठी गुंतवणूक फायद्याची ठरते. महिन्याला ५० हजार रुपये मिळवायचे असतील तर किती गुंतवणूक करावी लागेल?

यासाठी आर्थिक सल्लागार ४ टक्के पैसे काढण्याचा नियम सांगतात. म्हणजेच तुम्ही इतके पैसे जमा केले पाहिजेत, की त्यातले ४ टक्के रक्कम काढल्यानंतर तुमच्या वर्षभराच्या गरजा भागतील. महिन्याला तुम्हाला ५० हजार हवे असतील, तर रिटायर्डमेंट फंड १.५ कोटी असावा. म्हणजेच १.५ कोटीचे ४ टक्के = ६ लाख रुपये, म्हणजेच महिन्याचे ५० हजार.

समजा तुमचं वय ४० वर्ष आहे आणि तुम्ही ६०व्या वर्षी रिटायर्ड होताय, तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी २० वर्ष आहेत. १.५ कोटींची गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला १९,८०० रुपये SIP करावी लागेल. त्यावर १० ते १२ टक्के रिटर्न्स मिळाल्यास कोटींची गुंतवणूक करता येते.

रिटायर्डमेंट प्लॅनिंगवेळी या चुका करू नका -

तुमचे संपूर्ण पैसे एफडीमध्ये टाकू नका

FD मध्ये पैसे सुरक्षित असतात. पणदीर्घकाळाचा विचार करता एफडीवर मिळणारं व्याज महागाईवर मात करण्यासाठी पुरेसे नसतं. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीमध्ये म्युच्युअल फंडांचा समावेश करणं फायद्याचं ठरेल.

इन्शुरन्स काढा

उतार वयात किंवा वृद्धापकाळात सर्वाधिक खर्च आरोग्यावर असतो. जर तुमचा इन्शुरन्स नसेल तर आयुष्यभराची जमापुंजी डॉक्टरच्या बिलांमध्ये जाऊ शकते. त्यामुळे इन्शुरन्स काढणं महत्त्वाचं आहे.

वाट्टेल तसे पैसे खर्च करू नका

रिटायर्डमेंटनंतर चांगली गुंतवणूक असली, तरी तुमचे पैसे हवे तसे उधळू नका. गरजा, हौस पूर्ण करा, पण गरजेपेक्षा अति खर्च टाळा. अन्यथा गुंतवणूक लवकर संपेल आणि गरजेला हातात पैसे उरणार नाहीत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

SIP Calculator : महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करून होऊ शकता करोडपती, वाचा या टिप्स
ATM मधून पैसे आले नाही, पण बँक खात्यातून कट झाले; तक्रारीनंतर ग्राहकाला मिळाली नुकसानभरपाई, प्रकरण काय?