Apple iTunes आणि क्रोम युजर्ससाठी सरकारचा इशारा, चुकूनही करू नका ही चूक

Tech News : सरकारने अ‍ॅप्पल आयट्युन्स आणि गुगल क्रोम युजर्सला एक इशारा दिला आहे. यामध्ये म्हटलेय की, हॅकर्स बगचा (Bug)फायदा घेऊन युजर्सवर निशाणा साधू शकतात.

Tech News :  सरकारने अ‍ॅप्पल आयट्यून्स (Apple iTunes) आणि गुगल क्रोम( Google Chrome) युजर्ससाठी एक इशारा जारी केला आहे. इंडियन कंप्युटर इमरेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांनी बग संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, हॅकर्स डिवाइसमध्ये हॅकर्स मालवेअरच्या (Malware) माध्यमातून युजर्सला निशाणा बनवू शकतो. अशातच क्रोम डेस्कटॉप युजर्स आणि अ‍ॅप्पल आयट्यून्स युजर्सला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्या युजर्सला धोका?
सीईआरटी-इन कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, कोरमीडिया नावाने जाणाऱ्या कंपोनेंटमध्ये अद्याप काही त्रुटी आहेत. याचा थेट फायदा हॅकर्स घेऊ शकतात. या समस्येमुळे सॉफ्टवेअर विंडोजसाठी 12.13.2 च्या आधीच्या अ‍ॅप्पल आयट्यून्स वर्जनचा समावेश आहे. या युजर्सने त्यांना आलेल्या एखाद्या मेसेज किंवा नोटीसकडे दुर्लक्ष करावे असा सल्लाही कंपनीकडून देण्यात आला आहे. अन्यथा एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

हॅकर्स कसा करतात युजर्सवर हल्ला?
अ‍ॅप्पल आयट्यून्समध्ये हॅकर्स एक विशेष प्रकारची रिक्वेस्ट पाठवून युजरला निशाणा करू शकतात. हॅकर्सद्वारे पाठवण्यात आलेले रिक्वेस्ट मान्य केल्यास डिवाइसमध्ये मालवेअर इंस्टॉल केला जाऊ शकतो. तर गुगल क्रोमच्या युजरला हॅकर्स एक विशेष रुपात तयार केलेल्या HTML पेजवर जाण्यासाठी सांगितले जाते. हे पेज सुरु केल्यास हॅकर्स डिवाइसमध्ये मालवेअर इंस्टॉल करु शकतात.

असा करा बचाव

आणखी वाचा : 

WhatsApp वर एखाद्याने ब्लॉक केलयं? असे काढा शोधून

भारतीय बनावटीचा Hanooman AI चॅटबॉट लाँच, स्वदेशी भाषांना सपोर्ट करण्यासह देण्यात आल्यात 'या' खास गोष्टी

Share this article