Huawei Watch Air : 7 दिवसांची बॅटरी, 6.9 मिमी जाडी आणि फक्त 27 ग्रॅम वजन! बाजारात धुमाकूळ घालायला येतेय हुआवे वॉच एअर

Published : Nov 21, 2026, 01:25 PM IST

Huawei Watch Air: फक्त 6.9 मिमी स्लिम टायटॅनियम बॉडी, 1.92 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह 24 नोव्हेंबरला बाजारात 'हुआवे वॉच एअर' (Huawei Watch Air) लाँच होत आहे.

PREV
14
24 नोव्हेंबरला बाजारात येतेय 'हुआवे वॉच एअर'

चीनमध्ये मोठ्या लाँच इव्हेंटच्या आधी 'हुआवे वॉच एअर' (Huawei Watch Air) स्मार्टवॉचचा अधिकृत टीझर हुआवेने प्रसिद्ध केला आहे. या महिन्याच्या अखेरीस, कंपनीच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्ससह हे स्मार्टवॉच लाँच होईल. यात फक्त 6.9 मिमी स्लिम टायटॅनियम बॉडी, स्क्वेअर डिस्प्ले आणि अतिशय बारीक बेझल आहे. हुआवेने हे घड्याळ तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये दाखवले असले तरी, त्याची किंमत आणि संपूर्ण फीचर्स अद्याप अधिकृतपणे सांगितलेले नाहीत.

24
हुआवे वॉच एअरची लाँच डेट आणि फीचर्स
हुआवेने रिलीज केलेल्या टीझरनुसार, वॉच एअर मॉडेलमध्ये स्क्वेअर डिस्प्ले आणि 1.4 मिमी बारीक बॉर्डर आहे. चमकदार टायटॅनियम बॉडीसोबतच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी सॅफायर ग्लास वापरण्यात आला आहे. फक्त 6.9 मिमी जाडी असल्यामुळे, हुआवेने आतापर्यंत लाँच केलेल्या सर्व स्मार्टवॉचमध्ये हे सर्वात पातळ असणार आहे. सिल्व्हर, लाईट गोल्ड आणि ब्लॅक टायटॅनियम या तीन रंगांमध्ये हे घड्याळ सादर करण्यात आले आहे. याशिवाय, ग्राहकांना सिलिकॉन, विणलेला स्ट्रॅप आणि मिलानीज मेटलसारख्या स्ट्रॅपचे ऑप्शन्स मिळतील.
34
लीक झालेले महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स

प्रसिद्ध टिपस्टर 'डिजिटल चॅट स्टेशन'ने सांगितले आहे की, यात LTPO 2.0 तंत्रज्ञानाचा 1.92-इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. 3,500 निट्स पीक ब्राइटनेस आणि 86% स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ असेल अशी चर्चा आहे. फक्त 27 ग्रॅम वजन असलेल्या या घड्याळात हाय-सिलिकॉन स्टॅक्ड बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर 7 दिवसांपर्यंत बॅटरी चालेल. आधी 5 दिवसांच्या बॅटरी लाईफची चर्चा होती. यात हुआवे वॉच 6 सारखे हेल्थ ट्रॅकिंग आणि वॉच जीटी 7 प्रो सारखे स्पोर्ट्स ट्रॅकिंग फीचर्स असू शकतात. पण हुआवेने या माहितीची अजून पुष्टी केलेली नाही. 24 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये हुआवे मेट एक्स8 फोल्डेबल फोन आणि मेट 90 एअरसोबत हे घड्याळ लाँच होईल.

44
चिनी कंपनीसाठी TSMC ने चिपचे नियम कडक केले

दुसरीकडे, अमेरिकेच्या नवीन निर्याती नियमांमुळे प्रगत चिप बनवण्याच्या बाबतीत चीनची क्षमता आणखी कमी झाली असल्याची बातमी आहे. प्रगत उत्पादन प्रक्रियेचा वापर करणाऱ्या चिनी चिप डिझाईन कंपन्यांच्या काही ऑर्डर्सवर तैवानच्या TSMC ने बंदी घातली आहे. विशेषतः Nvidia चिपच्या जागी नवीन तंत्रज्ञान बनवत असलेल्या चिनी कंपन्यांना नवीन AI प्रोसेसर बनवणे आता आणखी कठीण होणार आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories