
आजकाल नोकरी मिळवणे खूप अवघड झालंय असं अनेकांचा गैरसमज आहे. अनेक ठिकाणी जॉब ओपनिंग निघत नाही तर काही ठिकाणी जॉब असेल तर तिथं तो लवकर मिळण्याची शक्यता नसते. योग्य नोकरी मिळवण्यासाठी स्कीलसोबत चांगला रिज्युमे बनवलेला असणे आवश्यक असतो. तरच आपल्याला जॉब मिळण्याची शक्यता निर्माण होते.
आपण जर चांगला रिज्युमे बनवला तर त्यामुळं आपल्याला चांगला जॉब मिळण्याची शक्यता निर्माण होते. आपण मात्र सगळ्या प्रकारच्या जॉबला एकाच प्रकारचा रिज्युमे पाठवून तिथून आपल्याला कॉल येईल याची अपेक्षा असते. पण असं फार कमी वेळा होत असल्याचं दिसून येत असत. आपण चॅट जीपीटीचा वापर करून काही मिनिटांमध्ये घरी बसल्या बसल्या चांगला रिज्युमे बनवू शकता.
आपण सर्वात आधी चांगला रिज्युमे बनवणार आहोत हे मनाशी एकदा ठरवून घ्या. त्यानंतर आपल्याला जी कागदपत्रे आवश्यक आहेत ती जवळ ठेवा. त्यामध्ये खासकरून कामाचा अनुभव, शिक्षण, कौशल्य, आपल्याला मिळालेली कागदपत्रे आणि इतर महत्वाच्या गोष्टी जवळ ठेवा. आपण फक्त इंजिनिअर म्हणून काम केलं असं टाकण्यापेक्षा तिथं कोणत्या कामाचा अनुभव आला हे टाकत राहावं.
आपण चॅट जीपीटीवर चांगला प्रॉम्प्ट देऊन रिज्युमे सहजपणे बनवू शकता. त्यासाठी आपण सुरुवात करताना काय काम केलं, कोणत्या कामाचा अनुभव आहे आणि कशात शिक्षण झालंय याबद्दलची माहिती द्यायची. त्यानंतर चॅट जीपीटीकडून आपल्याला मिळालेली माहिती एकदा व्यवस्थित तपासून पाहायची, काही चुकलं असेल तर ते बरोबर करून घ्यायचं.
आपल्याला चांगल्या फॉरमॅटमध्ये माहिती हवी असेल तर चॅट जीपीटीकडून तशी ती बनवून घ्यायची. या पद्धतीनुसार काही मिनिटांमध्ये आपला रिज्युमे सहजपणे तयार होऊ शकतो. एचआर किंवा हायरिंग मॅनेजरला आपला रिज्युमे आवडल्यावर पुढची प्रोसेस लवकर होत जाते. त्यामुळं रिज्युमे चांगलं बनवण्यावर सर्वात आधी लक्ष द्या.