घरात रोख किती पैसे ठेवता येतात, कायदेशीर मार्ग जाणून घ्या नाहीतर जाल जेलमध्ये....

Published : Sep 26, 2025, 10:05 PM IST
cash money

सार

घरी रोख रक्कम ठेवण्यावर कायद्याने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, पण तुमच्याकडे असलेल्या पैशांचा स्त्रोत तुम्हाला सिद्ध करता आला पाहिजे. उत्पन्नाचा वैध मार्ग सांगता न आल्यास, आयकर कायद्यानुसार ती रक्कम अघोषित संपत्ती मानली जाते. 

सध्या सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. शॉपिंगपासून पेमेंटपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या आहेत. अनेक जण आता घरी रोख पैसे ठेवत असतात. आपण या पैशांचा वापर व्यवहारांसाठी करत असतो. पण बराच वेळा घरात पैसे किती ठेवावे याबद्दल प्रश्न पडत असतो. आपण याबाबतचा कायदा काय सांगतो ते जाणून घेऊया.

रोख रक्कम घरी ठेवण्याची मर्यादा किती आहे? 

कायद्यानुसार घरी रोख ठेवण्याची काही मर्यादा असते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आयकर विभागानं घरात रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा ठेवलेली नाही. रक्कम छोटी असो किंवा मोठी ती घरी ठेवणे बेकायदेशीर नाही. मात्र त्या उत्पन्नाचा वैध मार्ग सांगता यायला हवा. आपण घरात कमावलेले पैसे कोणत्या मार्गांनी कमावले आहेत ते आपल्याला सिद्ध करता आल्यास ते कायदेशीर योग्य ठरत असते.

आयकर कायद्याचे नियम काय सांगतात? 

आयकर कायद्याचे नियम आपण जाणून घेऊयात. आयकर अधिनियम कलम 68 ते 69 बीममध्ये रोख आणि संपत्तीशी संबंधित नियमांचा उल्लेख आहे. Section 68: तुमच्या पासबुक आणि कॅशबुकमध्ये काही रक्कम नोंदवलेली आहे, मात्र तुम्ही त्याचा स्त्रोत सांगू शला नाही तर तर अनक्लेम्ड इनकम मानला जाईल. Section 69: जर तुमच्याकडे रोख रक्कम आहे किंवा गुंतवणूक असेल आणि तुम्ही त्याचा हिशोब देऊ शकत नसाल तर ते अनडिस्क्लोज्ड इनकम मानले जाईल. Section 69B: जर तुमच्याकडे घोषित उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असेल आणि तुम्ही त्याचा सोर्स सांगू शकला नाही तर टॅक्स आणि दंड आकारला जाईल.

उत्पन्नाचा मार्ग सांगता आला नाही तर चौकशी केली आणि आपल्याला देता आला नाही तर त्याचा योग्य हिशोब देऊ शकला नाही तर ती पूर्ण रक्कम अनडिस्क्लोज्ड इनकम किंव अघोषित संपत्ती मानली जाईल. अशा प्रकरणात ज्यांच्याकडे पैसे मागितले त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो. जप्त केलेल्या रकमेवर 78 टक्के दंड आकारला जाईल. आयकर विभागाला करचोरीचा संशय असल्यास खटला चालवला जाऊ शकतो.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

टाटा सियाराचा वाजला अलार्म, होंडा कंपनीची हि गाडी देणार टक्कर; कमी किंमतीत फीचर्स क्वालिटी
हे कसं काय झालं, महिंद्रा कंपनीची हि इलेक्ट्रिक गाडी ४ लाखांनी झाली स्वस्त; फीचर्स ऐकून पायाला येतील मुंग्या