490, 510 किंवा 520 रुपयांचे पेट्रोल-डिझेल भरल्याने फसवणूक टळणार नाही, या दोन गोष्टींवर द्या लक्ष

Published : Nov 23, 2025, 05:00 PM IST

पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पेट्रोल भरण्यापूर्वी मशीनची डेनसिटी आणि रिडींग तपासा, तसेच गुगलवर पंपाचे रेटिंग पाहूनच पेट्रोल भरा. या सोप्या उपायांमुळे तुमची संभाव्य फसवणूक टळू शकते.

PREV
15
पेट्रोल पंपावर फसवणूक होऊ नये म्हणून करा 'या' गोष्टी, अन्यथा पेट्रोलऐवजी भरली जाईल हवा

आपण पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेल्यानंतर पूर्ण आकडा कधीच सांगत नाही. आपण पेट्रोल टाकताना अनेकदा २२० किंवा २६० रुपयांचे पेट्रोल टाका असं सांगत असतो. अशावेळी पेट्रोल पंपवाले आपल्याला फसवत तर नाही ना अशी शक्यता निर्माण होत असते.

25
२२० किंवा ४५० च पेट्रोल टाकणं म्हणजे भ्रम

आपण गाडीमध्ये २२० किंवा ४५० च पेट्रोल टाकणं म्हणजे निव्वळ भ्रम समजला जातो. आपण अशावेळी कोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

35
मशीनची डेनसिटी चेक करून घ्या

आपण पेट्रोल पंपावर गेल्यानंतर सर्वात आधी मशीनची डेनसिटी चेक करून घ्यायला हवी. पेट्रोलची ७२० ते ७७५ आणि डिझेलची ८२० ते ८६०च्या दरम्यान डेनसिटी असायला हवी असं सांगण्यात आलं आहे.

45
मशीनचे रिडींग तपासा

आपण दरवेळी पेट्रोल किंवा डिझेल भरायला गेल्यानंतर मशीनचे रिडींग तपासून पाहायला हवे. ते रिडींग ५० च्या खाली असल्यास आपण खात्रीलायक पेट्रोल भरू शकता. मशीनमध्ये छेडछाड असल्यास आपली फसवणूक होऊ शकते.

55
पेट्रोल पंपाचे गुगलवर रेटिंग बघून जा

पेट्रोल पंपाचे गुगलवर एकदा रेटिंग बघा आणि त्यानुसार जायचं का नाही हा निर्णय घ्या. काही ठिकाणचे रिव्ह्यू लोकांनी वाईट पद्धतीने टाकलेले असतात, त्यामुळं आपण चांगले रिव्ह्यू असलेल्या पेट्रोल पंपावर जायला हवं.

Read more Photos on

Recommended Stories